झाशीतील नन्स प्रकरणावरून राजकारण सुरु, गृहमंत्री अमित शहांचे चौकशीचे आदेश

विशेष प्रतिनिधी 

झाशी : उत्तर प्रदेशातील झाशी येथे दोन नन्स आणि त्यांच्यासोबत असलेल्या सहकाऱ्यांना अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेच्या सदस्यांनी धक्काबुक्की करत त्यांना रेल्वेतून खाली उतरविल्याचा प्रकार उघडकीस आला आहे.Home Minister Amit Shah orders inquiry into nuns case in Jhansi

या नन्सवरती धर्मपरिवर्तनाचा आरोप करत त्यांना धक्काबुक्की करण्यात आल्याचे सूत्रांनी सांगितले. दरम्यान केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी या घटनेचे गांभीर्य लक्षात घेऊन उच्चस्तरीय चौकशीचे आदेश दिले आहेत.या नन्स आणि त्यांचे सहकारी १९ मार्च रोजी हरिद्वार- पुरी उत्कल एक्स्प्रेसमधून प्रवास करत होते. त्यावेळी जमावाने त्यांना डब्यामध्ये घेराओ घातला. यामध्ये काही पोलिस कर्मचारी देखील सहभागी होते

असे सीसीटीव्ही फुटेजमधून दिसून येते. पुढे या नन्सना गाडीतून खाली उतरविण्यात आले. या नन्सची रेल्वे प्लॅटफॉर्मवरील छायाचित्रे उघड झाली आहेत.

रेल्वे प्रशासनाने मात्र त्यांच्यावरील हे आरोप फेटाळून लावले आहेत. तसा कोणताही पुरावा आमच्या हाती लागला नसल्याचे रेल्वेकडून सांगण्यात आले. दुसरीकडे या घटनेचे केरळमध्येही पडसाद उमटले. मुख्यमंत्री पी. विजयन यांनी हा मुद्दा उचलून धरताना दोषींवर तत्काळ कठोर कारवाई करण्यात यावी अशी मागणी केली आहे.

Home Minister Amit Shah orders inquiry into nuns case in Jhansi

    Leave Your Comment

    Your email address will not be published.*