पॅलेस्टिनी रॉकेट हल्ल्यात केरळमधल्या सौम्याचा मृत्यू; पतीशी सुरु असलेला व्हिडिओ कॉल अचानक झाला डिस्कनेक्ट


गाझा येथून पॅलेस्टाईन अतिरेक्यांनी केलेल्या रॉकेट हल्ल्यात इस्त्रायलमधील 30 वर्षीय भारतीय महिला ठार झाली आहे. रोजगारानिमित्त 32 वर्षीय सौम्या संतोष ही मूळ केरळची रहिवासी सध्या इस्रायलमध्ये वास्तव्यास होती. Soumya from Kerala killed in Palestinian rocket attack in Israel; was on video call with husband Santosh which was suddenly disconnected


वृत्तसंस्था

जेरुसलेम : गाझा येथून पॅलेस्टाईन अतिरेक्यांनी केलेल्या रॉकेट हल्ल्यात इस्त्रायलमधील 30 वर्षीय भारतीय महिला ठार झाली आहे. रोजगारानिमित्त 32 वर्षीय सौम्या संतोष ही मूळ केरळची रहिवासी सध्या इस्रायलमध्ये वास्तव्यास होती.

स्थानिक हिब्रू माध्यमांनी दिलेल्या माहितीनुसार एका वृद्ध महिलेची केअरटेकर म्हणून सौम्या इस्रायलमध्ये काम करत होती. रॉकेट हल्ल्यात ही वृद्ध महिला गंभीर जखमी झाली तर सौम्या बळी गेली.



इस्रायली चॅनेल 12 च्या म्हणण्यानुसार रॉकेट हल्ले सुरु झाले तेव्हा या दोघी घरात होत्या. बॉम्ब आश्रयस्थान त्यांच्या घरापासून केवळ एका मिनिटाच्या अंतरावर होते. पण त्या वेळेत पोहोचू शकल्या नाहीत आणि त्यांचे घर रॉकेट हल्ल्यात वाचण्याइतके बळकट नव्हते.

हारेत्झ या इस्रायली दैनिकाने दिलेल्या महितीनुसार सौम्या संतोष यांच्या पश्चात पती आणि नऊ वर्षाची मुलगी आहे. सौम्या संतोष, या केरळमधील इडुक्की जिल्ह्यातील रहिवासी होत्या. सौम्या गेल्या सात वर्षांपासून इस्रायलमध्ये राहत होती.

तिचा एक नऊ वर्षांचा मुलगा आणि पती मायदेशी केरळमध्ये राहतात. सौम्याचे वडील सतीश हे कंजिकुझी पंचायत समितीचे माजी सदस्य असून आई सावित्री गृहिणी आहे. सन 2017 मध्ये सौम्या केरळमध्ये आली होती. ही तिची शेवटचीच भेट ठरली.

सौम्या या दक्षिण इस्त्रायली किनारपट्टीवरील अशकलोन शहरात एका ज्येष्ठ महिलेची देखभाल करण्याचे काम करत होत्या. गाझा पट्टीला लागून असलेले अश्कलोन शहर सध्या पॅलेस्टाईन अतिरेक्यांच्या जोरदार रॉकेट हल्ल्यांच्या कचाटयात सापडले आहे.

मंगळवारी रात्री 9 पर्यंत या शहरातील कमीतकमी 31 जण रॉकेट हल्ल्यात बळी गेले आहेत. सोमवारी संध्याकाळपासून गाझा पट्टीतून हमासच्या अतिरेक्यांनी इस्रायलवर शेकडो रॉकेटसनी हल्ला केला.

मंगळवारी इस्रायलचे भारतातील राजदूत रॉन मालका यांनी ट्विटरवरुन सौम्याच्या मृत्यूबद्दल शोक व्यक्त केला. “हमासच्या दहशतवादी हल्ल्यामुळे ठार झालेल्या सौम्या संतोषच्या कुटूंबियांप्रती इस्रायलच्यावतीने मनःपूर्वक संवेदना व्यक्त करतो.

आमची अंत: करणे तिच्या 9 वर्षांच्या मुलासोबत अश्रू ढाळत आहेत ज्याने आपल्या आईला गमावले. हा एक क्रूर दहशतवादी हल्ला आहे,” असं त्यांनी ट्विटमध्ये म्हटले आहे.केरळमधील सौम्याच्या कुटुंबियांनी सांगितले की,

इस्रायलवर रॉकेट हल्ले चालू असताना संध्याकाळी सौम्या व्हिडिओ कॉलवरून पती संतोषशी बोलत होती. “व्हिडिओ कॉल चालू असताना माझ्या भावाला मोठा आवाज ऐकू आला.

अचानक फोन डिस्कनेक्ट झाला. त्यानंतर आम्ही ताबडतोब तेथे काम करणाऱ्या मल्याळी नागरिकांशी संपर्क साधला. तेव्हा दुर्घटनेची माहिती मिळाली,” असे संतोषच्या भावाने सांगितले.

Soumya from Kerala killed in Palestinian rocket attack in Israel; was on video call with husband Santosh which was suddenly disconnected

महत्त्वाच्या बातम्या

Array

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात