केरळमध्ये डाव्यांचा पाया रचणाऱ्या ज्येष्ठ्य कम्युनिस्ट नेत्या के. आर.गौरी काळाच्या पडद्याआड


विशेष प्रतिनिधी

तिरूअनंतपुरम – केरळमधील ज्येष्ठ मार्क्सवादी नेत्या आणि माजी मंत्री के. आर.गौरी (वय १०२) यांचे आज येथील खासगी रुग्णालयामध्ये वृद्धापकाळाने निधन झाले. प्रकृती अस्वास्थ्यामुळे काही दिवसांपूर्वी त्यांना आयसीयूमध्ये दाखल करण्यात आला होते. Iron lady K. R. Gouri no more

ज्येष्ठ कम्युनिस्ट नेते ईएमएस नंबुद्रीपाद यांच्या नेतृत्वाखाली १९५७ मध्ये स्थापन झालेल्या पहिल्या मंत्रिमंडळामध्ये गौरी अम्मांचा समावेश होता. राज्याच्या मंत्रिमंडळामध्ये सहभागी असलेल्या त्या पहिल्या महिला मंत्री होत. केरळमधील भूमिहीन शेतकऱ्यांना हक्काची जमीन मिळवून देणारे क्रांतिकारी विधेयक आणण्यात त्यांचा मोठा वाटा होता. सक्रिय राजकारणामध्ये काम करताना त्यांनी ज्येष्ठ कम्युनिस्ट नेते टी.व्ही.थॉमस यांच्याशी विवाह केला होते.



गौरी अम्मा या केरळमधील सर्वाधिक प्रभावशाली राजकारणी म्हणून ओळखल्या जात असत. दक्षिणेमध्ये डावी चळवळ उभी करण्यात गौरी अम्मा यांचा मोठा वाटा होता. ब्रिटिश काळामध्ये पोलिसांशी दोन हात करत त्यांनी चळवळीची मोर्चेबांधणी केली होती. केरळमधील पुरुषांचे वर्चस्व असणाऱ्या राजकारणामध्ये त्यांनी स्वतःचं वेगळं स्थान निर्माण केल्याने त्यांना आयर्न लेडी अशी उपाधी देण्यात आली होती.

Iron lady K. R. Gouri no more

महत्त्वाच्या बातम्या

Array

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात