स्मृती इराणी यांची पहिली कादंबरी लाल सलाम लवकरच वाचकांच्या भेटीला, नक्षलवादी हल्यात मृत्यूमुखी पडलेल्यांना अनोखी श्रध्दांजली

विशेष प्रतिनिधी

नवी दिल्ली: नक्षलवादी हल्यात मृत्यूमुखी पडलेल्या वीर जवानांना महिला आणि बालकल्याण मंत्री स्मृती इराणी यांनी अनोखी श्रध्दांजली वाहिली आहे. एप्रिल २०१० मध्ये दंतेवाडा येथे ७६ जवानांच्या हत्येच्या घटनेवर त्यांनी लाल सलाम ही कादंबरी लिहिली आहे. १७ नोव्हेंबर रोजी या कादंबरीचे प्रकाशन होणार आहे.Smriti Irani’s first novel Lal Salaam to be publish soon, a unique tribute to those who died in the Naxalite attack

एप्रिल 2010 मध्ये दंतेवाडा येथे सीआरपीएफच्या 76 जवानांच्या दुदैर्वी हत्येपासून हे पुस्तक प्रेरित आहे. कायद्याची सेवा करणाºया वीर जवानांची कथा असलेली ही राजकीय थ्रिलर आहे. वेस्टलॅँड प्रकाशनाने ही कादंबरी प्रसिध्द केली आहे..

 



 

नक्षलवादी-माओवादी दहश्त असलेल्या भागात आव्हानांचा सामना करणाºया अधिकाºयांना या कांदबरीतनू आदरांजली वाहिली आहे. कादंबरीत विक्रम प्रताप सिंग नावाच्या अधिकाºयाचा आणि त्यांच्यासमोरी आव्हानांचा उल्लेख आहे. तिच्या पुस्तकाविषयी बोलताना इराणी म्हणाल्या, गेल्या काही वर्षांपासून ही कथा माझ्या मनात रुजत आह.

जोपर्यंत वेळ आली नव्हती मी ती कागदावर उतरवली नव्हती. मात्र, त्यानंतर सृहदांच्या आग्रहाकडे दुर्लक्ष करू शकले नाही.देशातील एका दूर्लक्षित भागातील कथनाला जनतेसमोर आणण्याचा प्रयत्न केला आहे.एप्रिल 2010 मध्ये दंतेवाडा येथे 76 केंद्रीय राखीव दलाच्या (सीआरपीएफ) जवानांच्या हत्येने यापुस्काची प्रेरणा मिळाली.

मसाबा गुप्ता यांना दिलेल्या मुलाखतीत स्मृती इराणी म्हणाल्या, माझे नाव न टाकता मी ही कादंबरी एका ज्येष्ठ लेखकाला वाचण्यास दिली. ती वाचून भारावलेले हे लेखक म्हणाले कोणी लिहिलीय ही कादंबरी? त्यानंतर मला कादंबरी प्रकाशित करण्याची प्रेरणा मिळाली.

त्यांनी सांगितले की आपला पुस्तकांशी जन्मापासूनच संबंध आहे. माझे वडील हे पुस्तक विक्रेते होते. प्रेमविवाह करून दिल्लीला आले तेव्हा त्यांच्याकडे केवळ दीडशे रुपये होते. त्या भांडवलावर त्यांनी रस्त्यावर पुस्तके विकण्यास सुरूवात केली. त्यांना पेरी मॅसनसारखे थ्रिलर लेखक आवडायचे. मलाही लहानपणापासून थ्रिलर वाचण्याची आवड होती.

Smriti Irani’s first novel Lal Salaam to be publish soon, a unique tribute to those who died in the Naxalite attack

महत्त्वाच्या बातम्या

 

Array

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात