धक्कादायक ऑनर किलींग, ब्राम्हण मुलाशी लग्न केले म्हणून दलीत तरुणाने बहिणीला घातल्या गोळ्या


विशेष प्रतिनिधी

इंफाळ : एका धक्कादायक ऑनर किलिंग प्रकरणात एका दलित व्यक्तीने ब्राह्मण मुलाशी लग्न केल्याबद्दल स्वत:च्या बहिणीची हत्या केली. मुलगा आणि त्याच्या कुटुंबीयांवर गोळ्या झाडून जखमी केले. यामध्ये बहिणीचा मृत्यू झाला असून तिचा पती आणि सासरे जखमी झाले आहेत.Shocking Honor Killing, Dalit youth shot his sister for marrying a Brahmin boy

दलित मुलीने ब्राम्हण जातीतील मुलासोबत प्रेमविवाह केल्याने संतप्त होऊन भाऊ आणि त्याच्या काकांनी नवविवाहित जोडपे आणि मुलाच्या कुटुंबावर गोळ्या झाडल्या. नवविवाहित जोडप्याला व कुटुंबातील इतर सदस्यांना उपचारासाठी रुग्णालयात दाखल केले, तेथे डॉक्टरांनी वधूला मृत घोषित केले. वर आणि त्याच्या कुटुंबीयांवर सध्या उपचार सुरू आहेत.



कोमल खाटीक (वय 22) या दलित मुलीने अलीगंज येथे राहणारा ब्राह्मण मुलगा करण गोस्वामी याच्याशी तिच्या आई आणि मामाच्या संमतीने प्रेमविवाह केला होता. दोघेही गेल्या वर्षभरापासून एकमेकांवर प्रेम करत होते. करण गोस्वामीचे कुटुंबीय या लग्नासाठी तयार होते. मात्र, कोमल खाटिकचा भाऊ याला विरोध करत होता.

लग्नानंतर कोमल खाटीक पुरोहिताना मोहल्ला येथे तिच्या सासरच्या घरी राहत होती. मात्र मंगळवारी अचानक कोमल खाटीकचा भाऊ, त्यांचे काका दिलीप कार्तिक आणि इतर काही लोक कोमलच्या सासरच्या घरी आले. त्यांनी कोमल आणि करण गोस्वामी यांना घरात प्रवेश करताच गोळ्या झाडल्या. करण गोस्वामीचे कुटुंबीय बचावासाठी आले असता आरोपींनी त्यांच्यावर हल्ला करून त्यांना जखमी केले आणि त्यानंतर ते घटनास्थळावरून पळून गेले.

Shocking Honor Killing, Dalit youth shot his sister for marrying a Brahmin boy

महत्त्वाच्या बातम्या

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    नितीन गडकरींकडून संत तुकाराम महाराज पालखी मार्गाची हवाई पाहणी अभिमानास्पद! जगातील पहिला ‘बांबू क्रॅश बॅरियर’ महाराष्ट्रातील महामार्गावर ”महाराष्ट्राच्या राजकारणाचा चिखल झाला आहे.”