NDTV चे ज्येष्ठ पत्रकार कमाल खान यांचे हृदयविकाराच्या झटक्याने निधन


प्रिंट मीडियामध्ये दीर्घकाळ राहिल्यानंतर त्यांनी NDTV मधून टीव्ही करिअरला सुरुवात केली आणि शेवटपर्यंत वाहिनीशी जोडलेले राहिले.Senior NDTV journalist Kamal Khan dies of heart attack


विशेष प्रतिनिधी

लखनऊ : एनडीटीव्हीचे जेष्ठ पत्रकार कमाल खान यांचे 61 व्या वर्षी हृदयविकाराच्या झटक्याने निधन झाले आहे.लखनऊ येथील राहत्या घरी त्यांनी अखेरचा श्वास घेतला.त्यांना रुग्णालयात घेऊन गेले असता डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले होते.सोशल मिडियावर विविध स्तरातून शोक व्यक्त केला जात आहे.



 

कमाल खान यांची जीवनशैली

कमाल खान हे एनडीटीव्हीचे कार्यकारी संपादक होते.पत्रकारितेतील अतुलनीय योगदानाबद्दल त्यांना रामनाथ गोएंका आणि राष्ट्रपतींच्या हस्ते गणेश शंकर विद्यार्थी पुरस्कार मिळाला होता.कमाल खान दोन दशके पत्रकारितेत होते. प्रिंट मीडियामध्ये दीर्घकाळ राहिल्यानंतर त्यांनी NDTV मधून टीव्ही करिअरला सुरुवात केली आणि शेवटपर्यंत वाहिनीशी जोडलेले राहिले. बातम्या सादर करण्याच्या त्यांच्या विशिष्ट शैली आणि भाषेसाठी ते खूप प्रसिद्ध होते.

कमाल खान यांचा परिवार

कमाल खान यांचा विवाह पत्रकार रुचि कुमारसोबत झाला होता. त्यांच्या मागे पत्नी रुची आणि मुलगा अमन आहे.बटलर पॅलेस, लखनौ येथे असलेल्या सरकारी बंगल्यात ते कुटुंबासह राहत होते. तेथे शुक्रवारी पहाटे त्यांनी अखेरचा श्वास घेतला.

Senior NDTV journalist Kamal Khan dies of heart attack

महत्त्वाच्या बातम्या

Array

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात