NDTV's Big scam Exposed, Illigaly Raised Funds Misusing UNICEF, complaint lodged by NCPCR

लहान मुलांच्या नावावर पैसे कमावण्याचा NDTVचा गोरखधंदा, युनिसेफच्या नावावर भरले स्वत:चे खिसे, राष्ट्रीय बाल हक्क आयोगाने दाखल केली तक्रार

राष्ट्रीय बाल अधिकार संरक्षण आयोगाने (NCPCR) आर्थिक गुन्हे शाखेला पत्र लिहून वादग्रस्त वृत्तवाहिनी NDTV विरुद्ध फसवणुकीची तक्रार दाखल करत कारवाईची मागणी केली आहे. आयोगाचा आरोप आहे की, ही वृत्तवाहिनी लहान मुलांच्या आडून अवैधरीत्या पैसे कमावण्याच काम करत होती. NDTV’s Big scam Exposed, Illegally Raised Funds Misusing UNICEF, complaint lodged by NCPCR


विशेष प्रतिनिधी

नवी दिल्ली : राष्ट्रीय बाल अधिकार संरक्षण आयोगाने (NCPCR) आर्थिक गुन्हे शाखेला पत्र लिहून वादग्रस्त वृत्तवाहिनी NDTV विरुद्ध फसवणुकीची तक्रार दाखल करत कारवाईची मागणी केली आहे. आयोगाचा आरोप आहे की, ही वृत्तवाहिनी लहान मुलांच्या आडून अवैधरीत्या पैसे कमावण्याच काम करत होती.

NDTVने बालकांच्या नावावर उकळला पैसा

दिल्ली पोलिसांतील सहआयुक्तांना लिहिलेल्या पत्रात म्हटले आहे की, NCPCRने भारत सरकारसोबत काम करणाऱ्या एका फाउंडेशनच्या नावाचा गैरवापर करून लहान बालकांसाठी कथित फंड गोळा करणाऱ्या NDTV विरुद्ध एका तक्रारीची चौकशी करावी. NCPCRने आपल्या पत्रात असेही म्हटले की, त्यांना NDTVविरुद्ध एक तक्रार मिळाली आहे, ज्यात आरोप करण्यात आला आहे की, ही वृत्तवाहिनी UNICEF सोबत मिळून कोरोना महामारीमुळे प्रभावित बालकांसाठी फंड गोळा करत आहे.

ज्यांचे नाव वापरले त्या संस्थेलाच कल्पना नाही

तक्रारकर्त्याने म्हटले की, NDTVने असा दावा केला आहे की, हे फंड चाइल्डलाइन इंडिया फाउंडेशनसाठी गोळा केले जात आहेत. जे महिला आणि बाल विकास मंत्रालयासोबत काम करते. तथापि, चाइल्डलाइन इंडिया फाउंडेशन ही मंत्रालयाअंतर्गत असलेली एक नोडल एजन्सी आहे. जी संकटग्रस्त बालकांसाठी ‘चाइल्डलाइन 1098’ नावाची एक टेलीफोन हेल्पलाइन संचालित करते. धक्कादायक बाब म्हणजे, मंत्रालय आणि फाउंडेशनला NDTVच्या फंड रेझिंगबद्दल तीळमात्र कल्पना नाही.

NCPCR ला लिहिलेल्या पत्रात तक्रारकर्त्याने आरोप केला की, NDTV ने सुरू केलेल्या कथित फंड रेझिंग अभियान शुद्ध फसवणूक होती, यात चॅनलने आपल्या फायद्यासाठी अवैधरीत्या मुलांच्या नावाचा वापर करून पैसा गोळा केला.

NDTV's Big scam Exposed, Illigaly Raised Funds Misusing UNICEF, complaint lodged by NCPCR

NDTVवर कारवाईची टांगती तलवार

ईओडब्ल्यू यांना तक्रार पाठवत बाल हक्क संरक्षण आयोगाने आता NDTV विरुद्ध कारवाईसाठी एक पत्र लिहिले आहे. एनडीटीव्हीवर गंभीर आरोप करत त्यांच्या या गोरखधंद्याची चौकशी करण्याची मागणी केली आहे. एवढेच नाही, आयोगाने बाल हक्क संरक्षण अधिनियम, 2005 च्या कलम 13 (1) (j) अंतर्गत NDTVवर कारवाईचीही तयारी केली आहे.

वादग्रस्त वृत्तवाहिनी NDTVच्या प्रमोटर्सवर मनी लॉन्ड्रिंग आणि करचुकवेगिरीचे गंभीर आरोप आहेत. त्यांनीच नोव्हेंबर 2020 मध्ये COVID-19 संकटाच्या काळात बालकांच्या सहायतेसाठी ‘NDTV-UNICEF रिइमॅजिन टेलिथॉन‘ अंतर्गत पैसे गोळा करणाऱ्याचे कुभांड रचले होते.UNICEF कडून एनडीटीव्हीच्या दाव्यांचे खंडन

विशेष म्हणजे NDTVचे हे सर्व दावे UNICEFनेही फेटाळून लावले आहेत. NDTV ने युनिसेफसारख्या जागतिक स्तरावर बाल हक्कांसाठी काम करणाऱ्या संस्थेच्या नावाचाही गैरवापर केला आहे. युनिसेफने याबाबत एक निवेदन जाहीर करून म्हटले की, काही संघटना आणि व्यक्ती कोणत्याही प्राधिकरणाशिवाय पैसा गोळा करण्यासाठी आणि प्रचारासाठी युनिसेफच्या नावाचा गैरवापर करत आहेत.

NDTV's Big scam Exposed, Illigaly Raised Funds Misusing UNICEF, complaint lodged by NCPCR

UNICEFने या वादग्रस्त वृत्तवाहिनीचे नाव न घेता NDTVच्या कथित फंड रेझिंग अभियानावर टीका करत म्हटले की, “आम्ही या अनैतिक प्रकाराची निंदा करतो आहोत. अशा कोणत्याही संघटनेशी किंवा व्यक्तींशी आमचा संबंध नाही. युनिसेफला दान देण्यासाठी अधिकृत संकेतस्थळाचा वापर करावा.”

NDTV’s Big scam Exposed, Illegally Raised Funds Misusing UNICEF, complaint lodged by NCPCR

NDTVचे पाय खोलात

दरम्यान, NDTVने अद्यापपर्यंत आपल्यावरील आरोपांचे उत्तर दिलेले नाही. राष्ट्रीय बाल हक्क संरक्षण आयोगाने दाखल केलेली तक्रार आणि NDTVच्या कथित फंड रेझिंगच्या गंभीर घटनेवरून आर्थिक गुन्हे शाखाला दिलेल्या पत्रानंतर आता या वृत्तवाहिनीविरुद्ध सखोल चौकशीची

NDTV's Big scam Exposed, Illigaly Raised Funds Misusing UNICEF, complaint lodged by NCPCR

    Leave Your Comment

    Your email address will not be published.*