मोठी बातमी : ‘लड़की हूं, लड़ सकती हूं’च्या पोस्टर गर्लचा आरोप – प्रियांका गांधींच्या सचिवाने तिकिटासाठी मागितली लाच! पुराव्यादाखल देणार व्हिडिओ!


काँग्रेसच्या ‘लड़की हूं, लड़ सकती हूं’ मोहिमेच्या पोस्टर गर्ल प्रियांका मौर्य यांनी प्रियांका गांधींच्या सचिवावर तिकिटासाठी लाच मागितल्याचा आरोप केला आहे. काँग्रेसमध्ये हेराफेरी सुरू असल्याचे त्यांनी म्हटले आहे. शुक्रवारी त्यांनी ट्विटमध्ये लिहिले की, मै लडकी हूं, लड सकती हूँ, पण तिकीट मिळू शकत नाही, कारण मी ओबीसी आहे आणि प्रियांका गांधी यांचे सचिव संदीप सिंह यांना लाच देऊ शकत नाही. Big news Congress Poster Dr priyanka Morya accused Party For Bribery in Ticket, Says Priyanka Gandhis secretary solicited bribe for ticket I have video


वृत्तसंस्था

लखनऊ : काँग्रेसच्या ‘लड़की हूं, लड़ सकती हूं’ मोहिमेच्या पोस्टर गर्ल प्रियांका मौर्य यांनी प्रियांका गांधींच्या सचिवावर तिकिटासाठी लाच मागितल्याचा आरोप केला आहे. काँग्रेसमध्ये हेराफेरी सुरू असल्याचे त्यांनी म्हटले आहे. शुक्रवारी त्यांनी ट्विटमध्ये लिहिले की, मै लडकी हूं, लड सकती हूँ, पण तिकीट मिळू शकत नाही, कारण मी ओबीसी आहे आणि प्रियांका गांधी यांचे सचिव संदीप सिंह यांना लाच देऊ शकत नाही.

त्यांनी पुढे लिहिले की, माझ्याकडे पुरावा म्हणून एक व्हिडिओ आहे जो उद्या चॅनलवर दिसेल. प्रियांका मौर्य यांनी लिहिले की, काँग्रेसमधील जातीयवादामुळे आमदार नरेश सैनी यांना पक्ष सोडावा लागला. काँग्रेस पक्षावर हेराफेरी होत असल्याचा आरोपही प्रियांका मौर्य यांनी केला असून त्याविरोधात बोलण्याचे धाडस कोणातच नाही, असेही त्या म्हणाल्या.

लाच न दिल्याने सरोजिनीनगर विधानसभा मतदारसंघातून तिकीट मिळाले नसल्याचे प्रियांका मौर्य यांनी सांगितले. ही मोहीम केवळ हेराफेरी असल्याचे त्या म्हणाल्या. लोक म्हणतील मला तिकीट नाही मिळाले तर मी हे करतोय. त्यांनी सांगितले की, आम्हाला 2024 ची तयारी करण्यास सांगितले जात आहे. प्रियांका मौर्य यांची काँग्रेसच्या लडकी हूं लड सकती हूँ या मोहिमेतील महत्त्वाची भूमिका होती. पोस्टरमध्ये त्या समोर दिसत आहेत. याशिवाय काँग्रेसने जारी केलेल्या महिला जाहीरनाम्यातही त्या पोस्टर गर्ल होत्या. यानंतर लखनऊमधील सरोजिनीनगर मतदारसंघातून प्रियांका मौर्य तिकिटासाठी दावेदार मानल्या जात होत्या. त्यांच्या जागी रुद्र दमन सिंह यांना तिकीट मिळाले आहे.

गुरुवारी काँग्रेसने 125 जागांसाठी उमेदवारांची पहिली यादी जाहीर केली, ज्यामध्ये आश्वासनानुसार 40 टक्के महिलांचा समावेश करण्यात आला आहे. यादी जाहीर झाल्यानंतर अवघ्या काही तासांतच डॉ. प्रियांका मौर्य यांनी ट्विट करून तिकीट वाटपात हेराफेरीचा आरोप केला होता.

Big news Congress Poster Dr priyanka Morya accused Party For Bribery in Ticket, Says Priyanka Gandhis secretary solicited bribe for ticket I have video

महत्त्वाच्या बातम्या

Array

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात