रुग्णांचे होणारे हाल पाहून मुंबईतील मराठमोळ्या महिलेने टाटा रुग्णालयाला दिली १२० कोटींची जागा दान

विशेष प्रतिनिधी

मुंबई : फुटपाथवर थांबलेले रुग्ण, रुग्णसेवेसाठी कर्मचाऱ्यांची उडणारी धांदल पाहून मुंबईतील एका मराठमोळ्या महिलेने टाटा रुग्णालयाला तब्बल १२० कोटी रुपयांची जागा दान दिली आहे. त्यामुळे या रुग्णालयात आणखी २०० जणांची केमोथेरपी शक्य होणार आहे. रुग्णालयापासून सुमारे ४०० मीटर अंतरावरच ही ३० हजार चौरस फुटांची जागा आहे.Seeing the condition of the patients, a Maratha woman from Mumbai donated a land worth Rs 120 crore to Tata Hospital

दीपिका मुंडले या आपल्या आत्यासमवेत अनेकदा टाटा रुग्णालयात रक्तदानासाठी जात असत. त्यावेळी रुग्णालयातील व्यवस्थापनावर येणारा ताण पाहून दीपिका यांचे मन द्रवले. ६१ वर्षांच्या दीपिका मुंडले यांनी त्यांची वडिलोपार्जित ३० हजार चौरस फुटांची जागा टाटा रुग्णालयाला देणगी म्हणून दिली आहे.सध्याच्या टाटा रुग्णालयापासून ही जागा फक्त ४०० मीटर अंतरावर आहे. आणखी 18 दात्यांनी मिळून या ठिकाणी इमारत बांधण्यासाठी 18 कोटी रुपयांचा निधी देणगी म्हणून दिला आहे. त्यांनी नावे न जाहीर करता अनामिक राहणे पसंत केले आहे. त्यांच्यावतीने परोपकार या धमार्दाय ट्रस्टने टाटा रुग्णालयाबरोबर बांधकामासाठीचा समजुतीचा करार केला आहे.

सध्या या रुग्णालयात 100 बेड असून ५०० रुग्णांना केमोथेरपी दिली जाते. परंतु आजही केमोथेरपीसाठी रुग्णांना तब्बल महिनाभर ताटकळत बसावे लागते. देशभरातून कॅन्सरचे रुग्ण मुंबईतील टाटा मेमोरियल हॉस्पिटलमध्ये उपचारासाठी येतात.

कित्येक महिने लोक फुटपाथवर राहतात. त्यामुळे आरोग्यावर परिणाम होतो. पावसाळ्यात या लोकांच्या समस्या वाढतात. रुग्णालयाजवळील फुटपाथवर रुग्ण थांबलेले दीपिका मुंडले यांनी पाहिले आहेत. त्यामुळे रुग्णांचे हाल होऊ नये यासाठी जमीन दान करण्याचा निर्णय घेतला.

कर्करुग्णांवर उपचार करणारे टाटा मेमोरियल रुग्णालय हे या क्षेत्रातील देशातील सर्वात मोठे रुग्णालय आहे. या ठिकाणी वषार्ला सुमारे ७५ हजार रुग्णांवर उपचार केले जातात. वर्षभरात साडेचार लाख रुग्ण नंतरच्या उपचारांसाठी येतात. त्यामुळे अनेकदा उपचार घेऊ इच्छिणाऱ्या रुग्णांची यादी मोठी असल्याने अनेकांना वाट पाहत थांबावे लागते.

नवे केमोथेरपी केंद्र झाल्यानंतर सध्या असलेल्या व्यवस्थेवरील ताण मोठ्या प्रमाणावर कमी होणार आहे. सध्या रुग्णालयात केमोथेरपीसाठी १०० बेड असून रोज ५०० रुग्णांना केमोथेरपी दिली जाते. असे असले तरी आजही रुग्णांना केमोथेरपीसाठी ३० दिवसांची वाट पाहावी लागते.

Seeing the condition of the patients, a Maratha woman from Mumbai donated a land worth Rs 120 crore to Tata Hospital

महत्त्वाच्या बातम्या