कापड उद्योगाला प्रोत्साहनासाठी केंद्र सरकार देणार १०,६३३ कोटी रुपयांचे अनुदान

विशेष प्रतिनिधी

नवी दिल्ली : देशातील कापड उद्योगाला प्रोत्साहन देण्यासाठी केंद्र सरकारने पुढील 5 वर्षांत या क्षेत्राला 10,683 कोटी रुपयांचे उत्पादनावर आधारित प्रोत्साहनपर अनुदान देण्याचा निर्णय घेतला आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली केंद्रीय मंत्रिमंडळाच्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला.The central government will provide a grant of Rs 10,633 crore to promote the textile industry

वस्त्रोद्योग मंत्री पीयूष गोयल म्हणाले, वस्त्रोद्योग क्षेत्राला उत्पादनावर आधारित 10,683 कोटी रुपयांची ही प्रोत्साहनपर राशी पुढील पाच वर्षांसाठी दिली जाणार आहे. यामुळे या क्षेत्रात 19 हजार कोटींची गुंतवणूक येण्याची शक्यता असून, यातून लाखो रोजगार निर्माण होणार आहेत.या योजनेचा फायदा महाराष्ट्र, गुजरात, तेलंगणा, पंजाब, ओडिशा, तामिळनाडू, उत्तर प्रदेश आणि आंध्र प्रदेशातील वस्त्रोद्योग क्षेत्राला मिळणार आहे. देशातील वस्त्रोद्योग क्षेत्र ही मोदी सरकारची प्राथमिकता आहे. या योजनेमुळे मानवनिर्मित धागे उत्पादनालाही प्रोत्साहन मिळणार आहे, त्याचप्रमाणे आंतरराष्ट्रीय बाजारात भारतीय उत्पादन स्थिरावण्यासाठीही मदत होणार आहे.

The central government will provide a grant of Rs 10,633 crore to promote the textile industry

महत्त्वाच्या बातम्या