युनिटेकच्या मालकांना तिहारमधून मुंबईतील तुरुंगात हलवण्याचा सर्वोच्च न्यायालयाचा आदेश


विशेष प्रतिनिधी

नवी दिल्ली – ‘युनिटेक’ या रिअल्टी फर्मचे माजी संचालक संजय चंद्रा आणि अजय चंद्रा यांना दिल्लीतील तिहार तुरुंगातून मुंबईतील आर्थर रोड आणि तळोजा तुरुंगामध्ये हलविण्याचे आदेश सर्वोच्च न्यायालयाने दिले आहेत. चंद्रा बंधूंवर दोन हजार कोटी रुपये बेकायदा मार्गाने सायप्रस आणि केमन बेटांवर वळविल्याचा आरोप आहे. Shift Unitech owner to mumbai orders court

तिहार तुरुंगामध्ये असताना तुरुंगाच्या अधिकाऱ्यांशी हातमिळवणी करून या दोघांनीही या खटल्याशी संबंधित साक्षीदारांशी संधान साधण्याचा प्रयत्न केला होता. येथून ते बाहेर असलेल्या कंपनीच्या अधिकाऱ्यांशी मुक्तपणे संवाद साधत होते तसेच मालमत्तांची व्यवस्था लावत होते असेही ‘ईडी’कडून सांगण्यात आले.दिल्लीतील ग्रीन पार्क परिसरात या दोघांनीही एक गोपनीय भूमिगत कार्यालय तयार केले होते, पॅरोलवर आणि जामिनावर बाहेर असताना ते येथे काही बाहेरच्या व्यक्तींना भेटत असत अशी खळबळजनक माहिती दिली.

सर्वोच्च न्यायालयाने या प्रकरणाची गंभीर दखल घेत दिल्ली पोलिस आयुक्तांना याप्रकरणी चौकशी करण्याचे आदेश दिले आहेत. न्यायालयाने तिहार तुरुंग प्रशासनातील अधिकाऱ्यांवरही कठोर शब्दांत ताशेरे ओढले आहेत.

Shift Unitech owner to mumbai orders court

महत्त्वाच्या बातम्या

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*    मंत्रालयात प्रवेशद्वाराजवळ महात्मा फुले, सावित्रीबाई फुले यांच्या तैलचित्राचे अनावरण भारतात आता एक देश एक चार्जर जलयुक्त शिवार योजना पुन्हा चालू होणार; शिंदे – फडणवीस सरकारचा महत्त्वाचा निर्णय