खासदार सुभाष भामरे यांना जाणवला चिकुन गुनियाचा त्रास , वायू सेनेच्या विमानाने मुंबईला हलवले

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी भ्रमणध्वनीवरुन खा.डॉ.भामरे यांची प्रकृतीची विचारणा केली . त्यानंतर तातडीने वायुसेनेचे विमान उपलब्ध करुन देण्यात आले आहे.MP Subhash Bhamre felt the pain of Chikun Gunia, moved to Mumbai by an Air Force plane


विशेष प्रतिनिधी

धुळे : देशाचे माजी संरक्षण राज्यमंत्री तसेच धुळयाचे खासदार डॉ. सुभाष भामरे यांना उपचारासाठी वायुसेनेच्या विमानाने मुंबई येथे हलवण्यात आले आहे.

डॉ.सुभाष भामरे यांना चिकुन गुनियाचा त्रास होत असल्याचे सांगीतले जात आहे. या दरम्यान पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी भ्रमणध्वनीवरुन खा डॉ भामरे यांची प्रकृतीची विचारणा केली . त्यानंतर तातडीने वायुसेनेचे विमान उपलब्ध करुन देण्यात आले आहे.मिळालेल्या माहितीनुसार,धुळ्याचे खासदार डॉ. सुभाष भामरे यांना गेल्या काही दिवसापासुन प्रकृतीमध्ये अस्वस्थता जाणवत असल्याने त्यांच्यावर धुळ्यात उपचार करण्यात येत होते.

ही  सर्व माहिती पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना कळाल्याने त्यांनी तातडीने भ्रमणध्वनीवरुन खासदार भामरे यांच्याशी संपर्क साधला. मोदींनी त्यांच्या प्रकृतीची विचारपूस केली . त्यानंतर तातडीने बंगळुरु येथून वायुसेनेचे विमान धुळ्यात पाठवण्याची व्यवस्था पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केली.

आज हे विमान धुळ्याच्या गोंदुर विमानतळावर आले. यानंतर खा. डॉ. सुभाष भामरे यांना या विमानाने मुंबई येथील रुग्णालयात उपचारासाठी पाठवण्यात आले.

MP Subhash Bhamre felt the pain of Chikun Gunia, moved to Mumbai by an Air Force plane

महत्त्वाच्या बातम्या