राहुल गांधी यांच्या रोजच्या ट्विटमुळे कोरोना जाणार नाही – संबित पात्रा यांची टीका


विशेष प्रतिनिधी

नवी दिल्ली – कॉंग्रेस नेते राहुल गांधी यांच्या रोजच्या ट्विटमुळे कोरोना जाणार नाही. त्यांना काहीही कळत नाही आणि साऱ्या विषयावर त्यांना बोलायचे असते अशी टीका भाजप प्रवक्ते संबित पात्रा यांनी कली आहे. Sambit Patra targests Rahul Gandhi

ते म्हणाले, शतकातून एकदाच येणारे संकट घालवण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याप्रमाणे प्रत्यक्ष जमिनीवर उतरून काम करायचे असते, जे राहुल गांधी यांनी कधीही केलेले नाही. रोज सकाळी ट्विट करणे आणि पंतप्रधानांवर टीका करणे यापेक्षा त्यांनी महाराष्ट्रासह इतर काँग्रेसशासित राज्यांच्या मुख्यमंत्र्यांना दडपेगिरीबद्दलची विचारणा करावी.कोरोनाच्या दुसऱ्या लाटेत देशात मृत्युमुखी पडणाऱ्या लाखो दुर्दैवी लोकांची आकडेवारी आणि वास्तविक परिस्थिती यात फरक असेल तर महाराष्ट्र, राजस्थानसह काँग्रेसशासित राज्यांनी त्यांच्याकडील मृतांचे खरे आकडे लपविले हाच अर्थ होतो. तसेच जी राज्ये पुरेशी लस मिळत नसल्याची ओरड करतात त्यांनी केंद्राकडून मोफत मिळालेल्या लसमात्रांचे व्यवस्थापन नीट होईल याची दक्षता घ्यावी, अशीही सूचनाही त्यांनी केली.

Sambit Patra targests Rahul Gandhi

महत्त्वाच्या बातम्या

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*    शिंदे – फडणवीसांची समृद्धी महामार्गावर टेस्ट ड्राईव्ह मोदींनी केला जगातील सर्वात मोठा रोड शो! मंत्रालयात प्रवेशद्वाराजवळ महात्मा फुले, सावित्रीबाई फुले यांच्या तैलचित्राचे अनावरण