पंतप्रधान मोदींवर अराजकवाद्यांनी केलेल्या भ्याड हल्ल्याचा सायना नेहवालने व्यक्त केला तीव्र निषेध


 

भाजपच्या नेत्यांपासून ते सामान्य कार्यकर्त्यांनी या प्रकरणावरुन वेगवेगळ्या प्रतिक्रिया दिल्या आहेत.Saina Nehwal strongly condemns the cowardly attack on Prime Minister Modi by anarchists


विशेष प्रतिनिधी

मुंबई : सध्या देशभरात पंजाबमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा ताफा अडवल्याच्या प्रकरणाची जोरदार चर्चा सुरु आहे.दरम्यान भाजपच्या नेत्यांपासून ते सामान्य कार्यकर्त्यांनी या प्रकरणावरुन वेगवेगळ्या प्रतिक्रिया दिल्या आहेत.

दरम्यान आता भारताची स्टार शटलर सायना नेहवालनेही याबद्दल प्रतिक्रिया दिली आहे.सायना नेहवाल म्हणाली की , “देशाच्या पंतप्रधानांच्या सुरक्षेसंदर्भात घडलेला प्रकार हा चुकीचा आहे, अशा आशयाची भूमिका सायना नेहवालने मांडली आहे. पंजाबमध्ये घडलेला प्रकार हा निंदणीय आहे.”

सायना नेहवालने ट्विटच्या माध्यमातून पंजाबमध्ये घडलेल्या प्रकाराचा निषेध नोंदवला आहे.ज्या देशात पंतप्रधानांच्या सुरक्षेसंदर्भात तडजोड होत असेल तर ते राष्ट्र सुरक्षित कस असू शकत. पंतप्रधान मोदींवर अराजकवाद्यांनी केलेल्या भ्याड हल्ल्याचा तीव्र निषेध करते, अशा आशयाचे ट्विट सायना नेहवालनं केले आहे.

Saina Nehwal strongly condemns the cowardly attack on Prime Minister Modi by anarchists

महत्त्वाच्या बातम्या

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*    वेदांत – फॉक्सकॉन सेमी कंडक्टर प्रकल्पाचे सर्वेसर्वा अनिल अग्रवाल यांचे महत्वाचे मुद्दे वनडे फॉरमॅटमधून ऑस्ट्रेलियन क्रिकेटर ॲरॉन फिंचची निवृत्ती भारत बनला 5वी सर्वात मोठी अर्थव्यवस्था