BULLI BAI : जावेद अख्तर म्हणाले – ‘बुल्ली बाई अ‍ॅपच्या मास्टरमाईंडला माफ करा…


  • ज्येष्ठ गीतकार जावेद अख्तर यांनी सोशल मीडियाच्या माध्यमातून आपले मत व्यक्त केले आहे.Javed Akhtar said Excuse the mastermind of Bully Bai app
  • त्यांनी लोकांना त्या मुलीला माफ करण्याचे आवाहन केले आहे.

विशेष प्रतिनिधी

मुंबई: बुली बाय अ‍ॅप प्रकरणात मुंबई पोलिसांनी 18 वर्षीय तरुणीला अटक केली आहे. अटकेनंतर काही वेळातच ज्येष्ठ गीतकार जावेद अख्तर यांनी सोशल मीडियाच्या माध्यमातून आपले मत व्यक्त केले. त्यांनी लोकांना मुलीला माफ करण्याचे आवाहन केले आहे.

जावेद अख्तर ट्विट करत काय म्हणाले…

जावेद अख्तर यांनी बुधवारी आपल्या ट्विटर हँडलवर नेटिझन्सना दया दाखवून मुलीला माफ करण्यास सांगितले. त्यांनी ट्विटमध्ये म्हटलयं की, “जर “बुल्ली बाई” अ‍ॅप 18 वर्षीय मुलीद्वारा बनविण्यात आले असून जिने नुकतेच कर्करोग आणि कोरोनामुळे आपले पालक गमावले आहेत.

तर मला वाटते की, महिलांनी तिला भेटले पाहिजे आणि वडिलधाऱ्यांप्रमाणे तिला समजून घेतले पाहिजे. मात्र जे ही तिने केलं ते अगदी चुकीचं केलं. तिच्याप्रतील दया दाखवा आणि तिला क्षमा करा.”

बुल्ली बाय अ‍ॅप काय आहे?

100 मुस्लिम महिलांचे फोटो या अ‍ॅपवर अपलोड करुन त्यांचा ऑनलाइन लिलाव करण्यात येत होता. आणि लोकांना लिलावात सहभागी होण्यासाठी प्रोत्साहित केले जात होते.

Javed Akhtar said Excuse the mastermind of Bully Bai app

महत्त्वाच्या बातम्या

 

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*    देशातील सर्वात स्वस्त इलेक्ट्रिक कार झाली लाँच : टाटा टियागो EV अवघ्या 8.49 लाखांपासून; एका चार्जवर 315 किमी वेदांत – फॉक्सकॉन सेमी कंडक्टर प्रकल्पाचे सर्वेसर्वा अनिल अग्रवाल यांचे महत्वाचे मुद्दे वनडे फॉरमॅटमधून ऑस्ट्रेलियन क्रिकेटर ॲरॉन फिंचची निवृत्ती