“छोट्या परदेश दौऱ्यावर” गेलेले राहुल गांधी जानेवारीच्या दुसऱ्या आठवड्यात भारतात परतणार


वृत्तसंस्था

नवी दिल्ली : नववर्षाच्या सुरुवातीला परदेशाच्या “छोट्या दौऱ्यावर” गेलेले काँग्रेसचे वरिष्ठ नेते खासदार राहुल गांधी हे आता जानेवारीच्या दुसऱ्या आठवड्यात भारतात परत येणार आहेत, असे वृत्त एएनआय या वृत्तसंस्थेने दिले आहे.Rahul Gandhi, who is on a “short foreign tour”, will return to India in the second week of January

राहुल गांधी हे “छोट्या परदेश दौऱ्यावर” गेल्याची बातमी काँग्रेसचे प्रवक्ते रणदीप सुरजेवाला यांनी दिली होती. राहुल गांधी हे छोट्या परदेश दौऱ्यावर गेले आहेत. भाजप नेत्यांनी त्यांच्या दौऱ्याविषयी अफवा पसरवू नयेत, असे सुरजेवाला यांनी चारच दिवसांपूर्वी पत्रकार परिषदेत सांगितले होते. राहुल गांधी यांचा हा “छोटा परदेश दौरा” आता मात्र दीर्घ काळाचा ठरताना दिसत आहे.



कारण काँग्रेसच्या सूत्रांच्या म्हणण्यानुसार राहुल गांधी हे जानेवारीच्या दुसऱ्या आठवड्यात भारतात करत येणार आहेत. याचा अर्थ नववर्षाचा संपूर्ण आठवडाभराचा त्यांचा परदेश दौरा आहे. ते इटलीमध्ये गेल्याचे सांगण्यात येत आहे.

काल पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या पंजाब दौऱ्यात सुरक्षाव्यवस्थेत मोठी त्रुटी आढळली. सुरक्षा व्यवस्थेचे उल्लंघन झाले. काँग्रेस नेत्यांनी या मुद्द्यावर पंतप्रधानांची खिल्लीही उडवली आहे. परंतु काँग्रेसच्या अध्यक्ष सोनिया गांधी, राहुल गांधी आणि प्रियांका गांधी यांच्या अधिकृत ट्विटर हँडलवर पंतप्रधानांच्या सुरक्षा व्यवस्थेत त्रुटी आढळली

आणि सुरक्षा व्यवस्थेचे उल्लंघन झाले याविषयी चकार शब्दही लिहिण्यात आलेला नाही. राहुल गांधी यांचे परदेश दौऱ्यावर असताना भारतात या घडामोडींवर बारकाईने लक्ष आहे. भारतातल्या राजकीय घडामोडींवर भाष्य करणारी अनेक ट्विट राहुल गांधी यांनी परदेशातूनच केली आहेत. परंतु पंतप्रधानांच्या सुरक्षा व्यवस्थेबाबत त्यांचे अद्याप एकही ट्विट आलेले नाही.

Rahul Gandhi, who is on a “short foreign tour”, will return to India in the second week of January

महत्त्वाच्या बातम्या

Array

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात