वृत्तसंस्था
मास्को : युक्रेनवर रशिया आठवड्याभरात हल्ला करण्याची शक्यता असून युक्रेन सीमेवर रशियन लष्कराने तिन्ही बाजूंनी घेरले असून पाणीपुरवठा देखील रोखला आहे. Russia to attack Ukraine within a week: Troops besiege, cut off water supply
रशियन सैन्याने युक्रेनच्या सीमेला वेढा घालून लष्करी सराव सुरू केला आहे. रशियन सैन्याने युक्रेनच्या सीमेला वेढा घातल्याच्या वृत्ताने युरोप आणि पाश्चात्य देशांमध्ये तीव्र पडसाद उमटले आहेत. दरम्यान, शनिवारी अमेरिकेचे राष्ट्रपती जो बायडेन आणि रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतिन यांच्याशी फोनवर चर्चा करणार आहेत.
रशियाचे अध्यक्ष व्लादिमीर पुतिन युक्रेनवर हल्ला करण्याचे आदेश देऊ शकतात, अशी चिंता अमेरिकन सरकारच्या प्रतिनिधींनी व्यक्त केली. ते म्हणाले की, रशियाने युक्रेनच्या सीमेला तिन्ही बाजूंनी घेरले असून तेथे लष्कर, नौदल आणि हवाई दल तैनात केले आहेत. सीमेवर ५५० हून अधिक तंबूही उभारलेले आहेत. युक्रेनच्या ओझोव्ह समुद्रातही नौदल सराव सुरू केला आहे. रशियाने युक्रेनचा पाणीपूरवठा रोखला आहे.
हिवाळी ऑलिम्पिकनंतर व्लादिमीर पुतिन हल्ला करतील, जेणेकरून त्यांचे सहकारी चीनचे राष्ट्राध्यक्ष शी जिनपिंग नाराज होणार नाहीत, परंतु आता गुप्तचर विभागाला वाटते की रशिया २० फेब्रुवारीला हिवाळी ऑलिंपिक संपण्याची वाट पाहणार नाही. हिवाळी ऑलिम्पिक २० फेब्रुवारीपर्यंत चीनची राजधानी बीजिंग येथे संपणार आहे.
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App