रूकना नहीं बढता चल! सलाम पंतप्रधान …अमेरिकेहून आले आणि कामालाही लागले…रात्री एक तास केली कामांची पाहणी…


वृत्तसंस्था

नवी दिल्ली : पंतप्रधान नरेंद्र मोदी हे आपल्या अमेरिका दौऱ्यावरुन परतले आहेत. त्यानंतर आल्या आल्याच ते कामाला लागले आहेत. काल रात्री 9.00 च्या सुमारास नवी दिल्लीतील नवीन संसदेच्या इमारतीच्या बांधकामाच्या ठिकाणी गेले. त्यांनी जवळपास एक तास त्या ठिकाणी घालवला आणि नवीन संसदेच्या इमारतीच्या बांधकामाच्या स्थितीची प्रत्यक्ष पाहणी केली. Rukna nahi badhta chal … he came from America and started working … he spent an hour at night inspecting the work …Jai ho PM

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते नव्या संसद भवन इमारतीचे भूमीपूजन झाले होते. भूमीपूजनानंतर सर्व धर्मांच्या धर्मगुरुंकडून प्रार्थना करण्यात आली होती. सुमारे 64500 चौरस मीटर जागेवर ही इमारत तयार होणार असून यासाठी सुमारे 971 कोटी रुपये खर्च येणार आहे. नव्या संसद भवनच्या सभागृहात लोकसभेच्या सदस्यांसाठी 888 खासदारांसाठी आसनव्यवस्था असेल. याशिवाय राज्यसभा सदस्यांसाठी 326 हून अधिक आसन असणार आहेत. येथे 1224 सदस्यांची बसण्याची व्यवस्था देखील असेल. याशिवाय प्रत्येक सदस्यासाठी 400 स्क्वेअर फूटचे कार्यालयही या नवीन इमारतीत असेल. जुन्या संसदेपेक्षा नवीन संसद सुमारे 17 हजार चौरस मीटर मोठे आहे.

या भेटीची पंतप्रधान मोदींनी कोणालाही पूर्वकल्पना दिली नव्हती. त्यामुळे सुरक्षा व्यवस्थेची देखील बरीच भंबेरी उडाली. या संपूर्ण प्रोजेक्टचं काम हे टाटा प्रोजेक्ट्स लिमिटेडला देण्यात आलं आहे. आता स्वत: मोदींनी येथील पाहणी केल्याने हा संपूर्ण प्रोजेक्ट पुन्हा एकदा चर्चेत आला आहे.

Rukna nahi badhta chal … he came from America and started working … he spent an hour at night inspecting the work …Jai ho PM

महत्त्वाच्या बातम्या

Array

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात