कोणत्याही संकटात सेवेचा आदर्श घालून देणाऱ्या राष्ट्रीय स्वयंसेवक संघाने कोरोनाच्या देणाऱ्या लाटेतही मदतकार्याचा डोंगर उभा केला आहे. देशभरात जवळपास ३,८०० हेल्पलाईन केंद्रे चालविण्यात येत आहेत, तर २८७ शहरांमध्ये कोरोनाबाधितांसाठी ९,८०० खाटांचे आयसोलेशन केंद्र व ११८ शहरांमध्ये कोविड केअर केंद्रे सुरू आहेत. RSS Team Service, 3,800 Helpline Centers Nationwide Isolation in 287 Cities, Covid Care Centers in 118 Cities
विशेष प्रतिनिधी
नागपूर : कोणत्याही संकटात सेवेचा आदर्श घालून देणाऱ्या राष्ट्रीय स्वयंसेवक संघाने कोरोनाच्या दुसºया लाटेतही मदतकार्याचा डोंगर उभा केला आहे. देशभरात जवळपास ३,८०० हेल्पलाईन केंद्रे चालविण्यात येत आहेत, तर २८७ शहरांमध्ये कोरोनाबाधितांसाठी ९,८०० खाटांचे आयसोलेशन केंद्र व ११८ शहरांमध्ये कोविड केअर केंद्रे सुरू आहेत.
राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे अखिल भारतीय प्रचार प्रमुख सुनील आंबेकर यांनी सांगितले की, संघासह सेवाभारतीच्या माध्यमातून कोरोनाप्रभावित कुटुंब व गरजूंना मदत उपलब्ध करून देण्यात येत आहे. सोबतच विविध शहरांमध्ये कोरोना केअर केंद्र, हेल्पलाईन केंद्र, सरकारी कोरोना केअर केंद्र व इस्पितळांमध्ये मदत उपलब्ध करून देणे, ऑनलाईन वैद्यकीय मार्गदर्शन, रक्तदान शिबिर, अंत्यसंस्कार, ऑक्सिजन पुरवठा, लसीकरण जागरूकता आदी उपक्रम सुरू केले आहेत.
आंबेकर म्हणाले, कोरोनाबाबतीत जनजागृतीसाठी साडेसात हजार ठिकाणी २२ हजारांपेक्षा अधिक स्वयंसेवक काम करीत आहेत. ११८ शहरांमध्ये कोविड केअर केंद्र सुरू असून, तेथे ७,४७६ खाटांची व्यवस्था आहे. त्यातील २,२८५ खाटा ऑक्सिजनयुक्त आहेत. देशातील ७६२ शहरातील ८१९ सरकारी कोविड केअर केंद्रांमध्ये सहा हजारांहून अधिक कार्यकर्ते मदत करीत आहेत.
देशात ८१६ ठिकाणी अंत्यसंस्कारासाठी सेवा दिली जात असून, ३०३ ठिकाणी शववाहिनी सेवा दिली जात आहे. आतापर्यंत १,२५६ ठिकाणी रक्तदान शिबिरे आयोजित करून ४४ हजार युनिट रक्त गोळा करण्यात आले आहे, तर चौदाशे ठिकाणी वैद्यकीय मार्गदर्शन केंद्रांच्या माध्यमातून दीड लाखांहून अधिक लोकांना मदत मिळाली असून, ४ हजार ४४५ चिकित्सक तेथे कार्यरत आहेत.
महत्त्वाच्या बातम्या
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App