Bengal Violence : पश्चिम बंगाल विधानसभा निवडणुकीच्या निकालानंतर पश्चिम बंगालमध्ये सुरू असलेल्या राजकीय हिंसाचाराचा राष्ट्रीय स्वयंसेवक संघाने तीव्र निषेध केला आहे. या घटना निंदनीय आणि पूर्वनियोजित असल्याचे म्हणत ममता बॅनर्जी यांच्या सरकारने त्वरित कारवाई करण्याची मागणी केली आहे. RSS Sarkaryvah Dattatrey Hosbale Appeal To CM Mamata Banerjee To take immediate Action on Bengal Violence
विशेष प्रतिनिधी
नागपूर : पश्चिम बंगाल विधानसभा निवडणुकीच्या निकालानंतर पश्चिम बंगालमध्ये सुरू असलेल्या राजकीय हिंसाचाराचा राष्ट्रीय स्वयंसेवक संघाने तीव्र निषेध केला आहे. या घटना निंदनीय आणि पूर्वनियोजित असल्याचे म्हणत ममता बॅनर्जी यांच्या सरकारने त्वरित कारवाई करण्याची मागणी केली आहे.
राष्ट्रीय स्वयंसेवक संघचे सरकार्यवाह दत्तात्रेय होसबळे यांनी जारी केलेल्या निवेदनात म्हटले आहे की, “आम्ही नवनिर्वाचित राज्य सरकारला आग्रह करतो की, राज्यात सुरू असलेला हिंसाचार त्वरित थांबवून तेथे कायद्याचे राज्य स्थापित करावे, दोषींना विनाविलंब अटक व कठोर कारवाई सुनिश्चित करणे हे त्यांचे सर्वोच्च प्राधान्य असले पाहिजे.”
RSS condemns this gruesome violence in severest terms.https://t.co/3kFxAftEk2 — RSS (@RSSorg) May 7, 2021
RSS condemns this gruesome violence in severest terms.https://t.co/3kFxAftEk2
— RSS (@RSSorg) May 7, 2021
विधानसभा निवडणुकीचा निकाल लागल्यापासून बंगालमध्ये मोठ्या प्रमाणावर हिंसाचार उफाळला होता. विविध मीडिया रिपोर्टनुसार बंगालमध्ये आतापर्यंत 20 हून अधिक भाजप कार्यकर्त्यांची हत्या झाली आहे आणि हजारो भाजप कार्यकर्त्यांनी तृणमूलच्या गुंडांच्या दहशतीपोटी आपले घरदार सोडून पलायन करावे लागले आहे. असंख्य जण आसाममध्ये गेले आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनीही या हिंसाचाराबद्दल चिंता व्यक्त केली आहे.
सरकार्यवाह होसबळे म्हणाले की, “हिंसाचारग्रस्तांमध्ये आत्मविश्वास आणि सुरक्षिततेची भावना जागृत करून पुनर्वसनासाठी आवश्यक ती पावले उचलली पाहिजेत. बंगालमध्ये शांतता कायम ठेवण्यासाठी आवश्यक तेवढी सर्व पावले उचलावीत. राज्य सरकारने या दिशेने कार्यवाही केली पाहिजे हे सुनिश्चित करण्यासाठी आम्ही केंद्र सरकारला आग्रह करतो. लोकशाहीमध्ये निवडणुका महत्त्वाची भूमिका बजावतात. निवडणुकांच्या याच क्रमवारीत पश्चिम बंगालची निवडणूक नुकतीच पूर्ण झाली आहे. बंगालच्या संपूर्ण समाजाने यात मोठ्या प्रमाणात सहभाग घेतला आहे. स्वाभाविकच, निवडणुकांमधील विरोध आणि आरोप कधी-कधी भावनेच्या भरात मर्यादा ओलांडतात, परंतु आपण नेहमी हे लक्षात ठेवले पाहिजे की, सर्व पक्ष त्यांच्या आपल्याच देशातील पक्ष आहेत आणि निवडणूक प्रक्रियेत भाग घेणारे उमेदवार, समर्थक, मतदार सर्वच आपल्याच देशाचे नागरिक आहेत.
ते म्हणाले की, “निवडणुकीच्या निकालांनंतर लगेचच अनियंत्रित राज्यव्यापी हिंसाचार केवळ निंदनीयच नाही तर पूर्वनियोजितदेखील आहे. समाजकंटकांनी महिलांसोबत घृणास्पद व्यवहार केला, निर्दोषांची निर्घृण हत्या, घरे जाळणे, व्यापारी संस्था व दुकाने लुटली आणि हिंसाचारामुळे अनुसूचित जाती-जमातीतील बांधवांसहित हजारोंना आपल्या घरातून बेघर होऊन जीविताच्या सुरक्षेसाठी इतर ठिकाणी आश्रय घ्यायला मजबूर व्हावे लागले. कूचबिहार ते सुंदरबनपर्यंत सर्वसामान्यांमध्ये भयाचे वातावरण आहे.
RSS Sarkaryvah Dattatrey Hosbale Appeal To CM Mamata Banerjee To take immediate Action on Bengal Violence
महत्त्वाच्या बातम्या
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App