Vaccination : भिकारी आणि कैद्यांनाही मिळणार लस, फोटो आयडीचीही गरज नाही, वाचा सविस्तर..

Vaccination : Beggars and prisoners will also get vaccine, photo ID will not be required, read details

Vaccination :  देशात कोरोना महामारीच्या संकटाने उग्र रूप धारण केलेले आहे, अशा वेळी देशभरात लसीकरण मोहीमही जोरात सुरू आहे. लसीकरणासाठी सध्या फोटो आयडीची गरज आहे. परंतु देशात असेही अनेक व्यक्ती आहेत, ज्यांच्याकडे अशी ओळखपत्रे नाहीत. अशा समूहाचा विचार करून केंद्राने त्यांना लसीकरणाचा लाभ देण्यासाठी नवीन मार्गदर्शक सूचना जारी केली आहे. Vaccination : Beggars and prisoners will also get vaccine, photo ID will not be required, read details


विशेष प्रतिनिधी

नवी दिल्ली : देशात कोरोना महामारीच्या संकटाने उग्र रूप धारण केलेले आहे, अशा वेळी देशभरात लसीकरण मोहीमही जोरात सुरू आहे. लसीकरणासाठी सध्या फोटो आयडीची गरज आहे. परंतु देशात असेही अनेक व्यक्ती आहेत, ज्यांच्याकडे अशी ओळखपत्रे नाहीत. अशा समूहाचा विचार करून केंद्राने त्यांना लसीकरणाचा लाभ देण्यासाठी नवीन मार्गदर्शक सूचना जारी केली आहे.

केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने लसीकरण पथकांसाठी एसओपी जारी केला आहे. यामध्ये फोटो ओळखपत्र नसलेल्या लोकांची कोविनवर नोंदणी करण्याची जबाबदारी देण्यात आली आहे. कोरोनाविरुद्ध सर्व लसीकरण सॉफ्टवेअरवर रेकॉर्ड केले जात आहे. यासाठी वैध ओळखपत्राची आवश्यकता आहे. केंद्राने म्हटले आहे की, वैध ओळखपत्र असलेल्या एका प्रमुख सूत्रधाराची नेमणूक केली जाईल, जो या गटाच्या लसीकरणाचा मध्यबिंदू आहे. केंद्राने असेही म्हटले आहे की, जेल अधिकारी आणि वृद्धाश्रमाचे अधिकारी मुख्य सूत्रधार म्हणून काम करू शकतात.

याअंतर्गत कोणाला देणार लस?

केंद्राने फोटो आयडी नसलेल्या अनेक लोकांचे गट लसीकरणासाठी चिन्हित केले आहेत. अशा गटात विविध धर्मांचे साधू / संत यांचा समावेश आहे, तुरुंगातील कैदी, मानसिक आरोग्य संस्थांमधील कैदी, वृद्धाश्रमातील व्यक्ती, भिकारी, पुनर्वसन केंद्रात राहणारे लोक यांचा समावेश आहे. ज्यांच्याकडे वैध फोटो आयडी नाही, तेदेखील यामुळे लसीकरणापासून वंचित राहणार नाहीत.

इतरांना लसीकरणासाठी आवश्यक कागदपत्रे

आधार कार्ड, मतदार ओळखपत्र, पासपोर्ट, ड्रायव्हिंग लायसन्स, पॅन कार्ड, एनपीआर स्मार्ट कार्ड आणि पेन्शनची कागदपत्रे लसीकरणासाठी फोटो ओळखपत्र म्हणून वैध आहेत. मंत्रालयाकडे अशा लोकांबाबत राज्य सरकारांकडून कित्येक अर्ज प्राप्त झाले आहेत, ज्यांच्याकडे एकही पुरावा नाही. मंत्रालयाने म्हटले आहे की, कोविड -19 लसीकरण सेवा केवळ ओळखपत्राचा पुरावा नसल्यामुळे नाकारता येणार नाही.

महत्त्वाच्या बातम्या

Array

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात