वृत्तसंस्था
नागपूर : कोरोनाच्या लॉकडाऊनमध्ये दिल्लीकरांची दुधाची गरज भागविण्यासाठी नागपूरहून ‘मिल्क ट्रेन’ रवाना झाली आहे. तब्बल 40 हजार लिटर दुधाचा साठा घेऊन ही रेल्वे दिल्लीतील हजरत निजामुद्दिन स्थानकाकडे रवाना झाली आहे.Ran ‘milk train’ for Delhiites;40,000 liters shipped from Nagpur
लॉकडाऊनमध्ये दिल्लीला दूध पुरवठा करणारी ही देशातली पहिलीच ‘मिल्क ट्रेन’ आहे. त्यासाठी रेल्वे व्यवस्थापक ऋचा खरे आणि अतिरिक्त रेल्वे व्यवस्थापक अनुप सत्पथी यांनी विशेष प्रयत्न केले.
‘मदर डेअरी’ या कंपनीकडून दिल्लीला दूधपुरवठा होत आहे. यासाठी कंपनीने रेल्वेला 97,000 रुपये भाडे दिले आहे. काल रात्री 12:55 वाजता नागपूरहून सुटलेली ही गाडी आज रात्री दिल्लीतील हजरत निजामुद्दिन स्थानकावर पोचेल.मदर डेअरीने भविष्यात असेच सहकार्य करण्याचे आश्वासन दिले.
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App