In Pics YOLO : जॅकलिन इन अ‍ॅक्शन ! ‘योलो’ फाउंडेशनच्या माध्यमातून रोटी बँकनंतर आता भटक्या प्राण्यांना करणार मदत


  • बॉलिवूड अभिनेत्री जॅकलिन फर्नांडिजने खुलासा केला की, योलो फाउंडेशन या तिच्या नव्या पुढाकारातून ती भटक्या प्राण्यांना मदत करणार आहे. Jacqueline Fernandez to help stray animals through her ‘YOLO’ Foundation

विशेष प्रतिनिधी

मुंबई: जॅकलिन फर्नांडिजने योलो फाउंडेशन नावाची एक संस्था  सुरू केली आहे   ज्याद्वारे ती गोरगरीबांना  मदत करते,  कामगारांना मास्क आणि सॅनिटायझर्स वितरीत करते आणि भटक्या प्राण्यांना मदत करते. ‘YOLO’

तिने नुकतेच इंस्टाग्राम पोस्टद्वारे भटक्या प्राण्यांना मदत करण्याचा उपक्रम जाहीर केला. जॅकलिन फर्नांडिजची इन्स्टाग्राम पोस्ट …

https://www.instagram.com/p/COkGzwLNPWC/?utm_source=ig_web_button_share_sheet

जॅकलिन मुक्या जनावरांसाठी पुढे आली आहे. गरीब प्राणी माणसांसारखी मदत मागू शकत नाहीत त्यामुळे आपण त्यांची काळजी घ्यायला हवी या हेतूने जॅकलिनने नुकतंच फिलाइन फाउंडेशनला भेट दिली.

नुकतेच जॅकलिनने भटक्या प्राण्यांना मदत करणार्या फिलाइन फाऊंडेशनला भेट दिली.या भेटीचे फोटो पोस्ट करत तीने लिहीले की, आम्ही  फिलाइनन फाऊंडेशनला भेट दिली आणि आमचे डोळे उघडले .रस्त्यावर  फिरणार्या मांजरी आणि भटक्या प्राण्यांना मदत करण्याचा प्रयत्न करीत असलेल्या लोकांना अनेक समस्यांचा सामना करावा लागतो .

अभिनेत्री जॅकलिन फर्नांडिसनं मदतीचा हात पुढे करत  समाजाच्या तळागाळात पोहोचून काम करण्यासाठी नुकतंच एका फाउंडेशनची सुरुवात केली. तिनं स्थापन केलेल्या ‘यू ओन्ली लिव्ह वन्स’ (YOLO) या फाउंडेशन अनेक स्वयंसेवी मिळून काम करणार आहे.यापूर्वी, जॅकलिन फर्नांडिजने  रोटी बँक फाऊंडेशनसह  भुकेल्या लोकांना अन्न  पुरवण्यात सहभाग घेतला आहे .

या भेटीचे काही फोटो तिने तिच्या सोशल मीडियावर शेअर केले आहेत. फिलाइन ही एक अशी सामाजिक संस्था आहे जे भटक्या जनावरांची मदत करते.

आपल्या YOLO फाउंडेशनच्या माध्यमातून समाजोपयोगी कार्य सुरु ठेवत, तिनं नुकतंच रोटी बँक फाउंडेशनचा दौरा केला. जॅकलिन मुंबई पोलीस दलासाठी मास्क आणि सॅनिटायझरचे वाटप करणार असून या कठीण काळात तिने भटक्या जनावरांच्या सहाय्यासाठी पुढाकार घेतला आहे.

Jacqueline Fernandez to help stray animals through her ‘YOLO’ Foundation

Array

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात