CM Stalin In Action : मुख्यमंत्र्यांकडून तामिळनाडूत कोरोना पॅकेज जाहीर, प्रत्येक कुटुंबाला मिळणार ४००० रुपये

CM Stalin In Action, CM announces Corona package in Tamil Nadu, each family will get Rs 4,000

CM Stalin In Action : द्रमुक नेते एमके स्टालिन यांनी आज तामिळनाडूच्या मुख्यमंत्रिपदाची शपथ घेतली. स्टालिन पहिल्यांदा मुख्यमंत्री झाले आहेत. पदभार स्वीकारल्यानंतर स्टालिन यांनी सर्वप्रथम कोरोनाचे पॅकेज जाहीर केले. याअंतर्गत आर्थिक मदत म्हणून प्रत्येक कुटुंबाला ४,००० रुपये देण्याच्या आदेशावर स्वाक्षरी केली. CM Stalin In Action, CM announces Corona package in Tamil Nadu, each family will get Rs 4,000


विशेष प्रतिनिधी

चेन्नई : द्रमुक नेते एमके स्टालिन यांनी आज तामिळनाडूच्या मुख्यमंत्रिपदाची शपथ घेतली. स्टालिन पहिल्यांदा मुख्यमंत्री झाले आहेत. पदभार स्वीकारल्यानंतर स्टालिन यांनी सर्वप्रथम कोरोनाचे पॅकेज जाहीर केले. याअंतर्गत आर्थिक मदत म्हणून प्रत्येक कुटुंबाला ४,००० रुपये देण्याच्या आदेशावर स्वाक्षरी केली. २ हजार रुपयांचा पहिला हप्ता मे महिन्यात देण्यात येईल. सीएम स्टालिन यांनी घोषणा केली की, खासगी रुग्णालयांमधील सर्व राज्य विमा कार्डधारकांच्या कोरोना संबंधित उपचाराचा खर्च राज्य सरकार उचलणार आहे.

स्टालिन यांच्या मंत्रिमंडळात 33 सदस्यांचा समावेश आहे. या 33 सदस्यांपैकी 15 जण प्रथमच मंत्री बनले आहेत. स्टॅलिन यांनी या मंत्रिमंडळात दपराईमुरुगन यांसारख्या ज्येष्ठ नेत्यांना कायम ठेवले आहे. द्रमुक नेते आणि पक्षाचे सचिव दपराई मुरुगन जलसंपदामंत्री असतील. आधीच्या सरकारमध्ये 2006-11 मध्ये ते सार्वजनिक बांधकाम मंत्री होते.

या वेळी मंत्रिमंडळात समाविष्ट झालेल्या 18 मंत्र्यांपैकी दुरुईमुरुगन हेही आहेत. त्याचवेळी चेन्नईचे माजी महापौर एम. सुब्रमण्यम आणि पक्षाचे नेते पी. के. सेकराबाबू पहिल्यांदा मंत्री होतील. मिळालेल्या माहितीनुसार, सुब्रमण्यम यांना आरोग्य व कुटुंब कल्याण विभाग, तर सेकराबाबूंना हिंदू धार्मिक व धर्मादाय व्यवस्थापन विभाग देण्यात आला.

पी.के. सेकराबाबू, एस. एस. नासार, चेन्नईचे माजी महापौर सुब्रमण्यम, द्रमुकचे माजी सचेतक सखापनी, पीके मूर्ती, आर. गांधी, एस.एस. शिवशंकर, पलानीवेल त्यागराजन, अनिबल महेश मोय्यामोजी, शिव व्ही. मयनाथन, सी. व्ही. गणेशन आणि टी. मनो थांगराज आहेत. मंत्रिमंडळात दोन महिला प्रतिनिधीही आहेत यात गीता जीवन आणि एन. क्लायवीजी सेल्वराज यांचा समावेश आहे.

CM Stalin In Action, CM announces Corona package in Tamil Nadu, each family will get Rs 4,000

महत्त्वाच्या बातम्या

Array

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात