Underworld Don Chhota Rajan : छोटा राजन अद्याप जिवंतच, एम्स अधिकाऱ्यांची माहिती, कोरोनावर उपचार सुरू

AIIMS official Confirms that Underworld don Chhota Rajan is still alive, under treatment of COVID19

Underworld don Chhota Rajan : कोरोनाने गँगस्टर छोटा राजनचा मृत्यू झाल्याच्या बातम्या काही माध्यमांनी दिल्या आहेत. यावर एम्स अधिकाऱ्यांनी स्पष्ट केले की, तो अद्याप जिवंतच असून त्याच्यावर उपचार सुरू आहेत. तथापि, छोटा राजनच्या प्रकृतीबाबत मात्र इतर कोणतीही माहिती समोर आलेली नाही. AIIMS official Confirms that Underworld don Chhota Rajan is still alive, under treatment of COVID19


वृत्तसंस्था

नवी दिल्ली : कोरोनाने गँगस्टर छोटा राजनचा मृत्यू झाल्याच्या बातम्या काही माध्यमांनी दिल्या आहेत. यावर एम्स अधिकाऱ्यांनी स्पष्ट केले की, तो अद्याप जिवंतच असून त्याच्यावर उपचार सुरू आहेत. तथापि, छोटा राजनच्या प्रकृतीबाबत मात्र इतर कोणतीही माहिती समोर आलेली नाही.

छोटा राजनचा कोरोनामुळे मृत्यू झाल्याचे वृत्त काही प्रसिद्ध इंग्रजी व हिंदी माध्यमांनी दिले होते. परंतु वृत्तसंस्था एएनआयने यासंदर्भात थेट एम्सच्या अधिकाऱ्यांना विचारणा केली असता, त्यांनी छोटा राजन अद्याप जिवंत असल्याचे स्पष्ट केले आहे. कोरोनाची लागण झाल्यावर सुरुवातीला छोटा राजनवर तिहार तुरुंगातच उपचार सुरू होते, परंतु प्रकृती खालावल्याने त्याला दिल्लीतील एम्समध्ये दाखल करण्यात आले. त्याच्या प्रकृतीबाबत इतर कोणतीही माहिती नसली, तरीही तो व्हेंटिलेटरवर असल्याचे विविध माध्यमांनी सांगितले आहे.

भारताचा मोस्ट वाँटेड गुंड असलेल्या राजनला दोन दशकांच्या शोधानंतर 2015 मध्ये इंडोनेशियाच्या बाली येथून अटक करण्यात आली होती. एकट्या महाराष्ट्रात राजनवर खंडणी संबंधित 68 केसेस दाखल आहेत. सप्टेंबर 2000 मध्ये राजनवर प्राणघातक हल्ला झाला होता. तिहारमध्ये राजन एकटाच होता. तेथे सुरक्षेच्या कारणास्तव इतर कैद्यांशी संवाद साधण्यासही त्याला परवानगी नव्हती. कारागृह अधिकाऱ्यांच्या संपर्कामुळे त्याला कोरोनाचा संसर्ग झाल्याचा संशय व्यक्त केला जात आहे.

देशातील कोरोना साथीच्या दुसर्‍या लाटेच्या पार्श्वभूमीवर गेल्या चार आठवड्यांत तिहारमधील 20,500 कैदी आणि 60 तुरुंग अधिकाऱ्यांपैकी कमीत कमी 170 जणांना कोरोनाची लागण झाली आहे. तिहारमध्ये कैदेत असलेल्या उमर खालिदलाही कोरोनाची लागण झाली आहे. खालिदला तुरुंगातच विलगीकरणात ठेवण्यात आले आहे.

तुरुंगातील अधिकाऱ्यांनी सांगितले की, देशातील सर्वाधिक गर्दी असलेल्या तुरुंग संकुलात संसर्गाचा प्रसार एवढा झाला आहे की, राजन आणि बिहारचा गँगस्टर नेता मोहम्मद शहाबुद्दीन यांच्यासारखे एकटे ठेवलेले कैदीही पॉझिटिव्ह झाले. तिहारमध्ये बंद असलेले इतर कैदी बराकीत इतर कैद्यांसमवेत एकत्र राहतात. पण राजन, शहाबुद्दीन आणि दिल्लीचा गुंड नीरज बवाना यांना एकटेच ठेवण्यात आले होते.

AIIMS official Confirms that Underworld don Chhota Rajan is still alive, under treatment of COVID19

महत्त्वाच्या बातम्या

Array

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात