कृषी कायदे रद्द; प्रियांका – टिकैत आक्रमक; पण पंजाब मधून कॅप्टन – सिद्धू – अकाल तख्त यांचे केंद्राबाबत अनुकूल सूर!!


वृत्तसंस्था

चंडीगढ : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज सकाळी देशाला संबोधित करत कृषी कायदे रद्द करण्याची घोषणा केली. त्यानंतर काँग्रेसचे सरचिटणीस प्रियंका गांधी यांनी याबाबत वटहुकूम काढण्याची मागणी केली आहे तसेच राकेश टिकैत त्यांनी आधी पेपर दाखवा मग आंदोलन मागे घेऊ, असे आव्हान दिले आहे.Repeal of agricultural laws; Priyanka – Tikait aggressive; But from Punjab, Captain – Sidhu – Akal Takht’s favorable tone about the center

या पार्श्वभूमीवर पंजाब मधून मात्र आता केंद्र सरकारच्या निर्णयावर अनुकूल सूर उमटले आहेत. विशेष म्हणजे एकमेकांचे राजकीय विरोधक देखील त्यामध्ये सामील झाले आहेत. पंजाबचे माजी मुख्यमंत्री कॅप्टन अमरिंदरसिंग, काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नवज्योत सिंग सिद्धू आणि अकाल तख्तचे कार्यकारी जथ्थेदार ग्यानी हरप्रीत सिंग यांचा यात समावेश आहे.कॅप्टन अमरिंदरसिंग यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांचे आभार मानले आहेत. मोदी आणि शहा यांनी पंजाबच्या शेतकऱ्यांचे दुःख जाणले आणि त्यामुळे त्यांनी योग्यवेळी कृषी कायदे रद्द केले आहेत. आता शेतकऱ्यांनी आंदोलन करण्याची गरज नाही. 29 नोव्हेंबरला संसदेची बैठक आहे. त्यावेळी केंद्र सरकार कायदेशीर प्रक्रिया सुरू करून कृषी कायदे मागे घेईल. त्यामुळे अनावश्यक आंदोलन चालू ठेवणे हे गैर आहे, असे मत कॅप्टन अमरिंदरसिंग यांनी व्‍यक्‍त केले आहे.

याच मताला नवज्योत सिंग सिद्धू यांनी दुजोरा दिला आहे. प्रकाश पर्व या पवित्र दिवशी स्वतः पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी चूक कबूल करून देशाची माफी मागितली आहे. पंजाबने माफ केले पाहिजे आणि आता आपण पुढची वाटचाल सुरू केली पाहिजे, असे मत सिद्धू यांनी व्यक्त केले आहे.

त्याच सुरात दर्जेदार अकाल तख्तचे कार्यकारी जथ्थेदार ग्यानी हरप्रीत सिंग आपला सूर मिसळला आहे. शेतकरी आंदोलनादरम्यान अनेकदा हिंदू आणि शीख यांच्यात फूट पाडण्याचा प्रयत्न झाला. आम्ही केंद्र सरकार विरोधात आंदोलन करत असल्याचा पुकारा करण्यात आला. पण प्रत्यक्षात तसे काही नव्हते. आमचे केंद्र सरकारशी काहीही भांडण नाही. कृषी कायद्यासंदर्भात आमचे फक्त मतभेद होते. आता केंद्र सरकारने हे कायदे रद्द केले आहेत, याचे आम्हाला समाधान आहे असे ज्ञानी हरप्रीत सिंह यांनी स्पष्ट केले आहे.

Repeal of agricultural laws; Priyanka – Tikait aggressive; But from Punjab, Captain – Sidhu – Akal Takht’s favorable tone about the center

महत्त्वाच्या बातम्या

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*    शिंदे – फडणवीसांची समृद्धी महामार्गावर टेस्ट ड्राईव्ह मोदींनी केला जगातील सर्वात मोठा रोड शो! मंत्रालयात प्रवेशद्वाराजवळ महात्मा फुले, सावित्रीबाई फुले यांच्या तैलचित्राचे अनावरण