‘राजा’च्या विरोधात बोलणे म्हणजे तुम्हाला हमखास शिक्षा, राकेश टिकैत यांची मोदींवर टीका


विशेष प्रतिनिधी

नवी दिल्ली : शेतकरी कायद्याला विरोध करणारे शेतकरी नेते राकेश टिकैत यांनी यांनी ट्विटरच्या माध्यमातून मोदी सरकारवर टीका केली आहे. ‘राजा’च्या विरोधात बोलणे म्हणजे तुम्हाला हमखास शिक्षा. सध्या महागाई आकाशाला भिडली आहे. पण केंद्र सरकारच्या विरोधात कुणी आवाज उठविला, तर त्याला शिक्षा मिळेल. हे काय राजा आहेत? हे किम जोंग उन बनत आहे. म्हणजे यांच्या विरोधात कुणी बोलू शकणार नाही. देशाची सत्ता त्यांच्या विरोधात एक शब्दही ऐकून घेत नाही. Rakesh Tiket lashes on PM Modiji



ते म्हणतात, पण हे सरकार तीनही कृषी कायदे मागे घेईल. शेतकरी आंदोलनाचा विजय होईल. सत्ताधाऱ्यांना ही गोष्ट मान्य करावी लागेल. जेव्हा जेव्हा देशावर संकट आले, सत्ता बेलगाम झाली, त्यावेळी दिल्ली आणि देशातील जनतेने त्याचा मुकाबला केला आहे. आता देखील करेल. ही एक वैचारिक क्रांती आहे, अशाने क्रांती कधी मरत नसते.

Rakesh Tiket lashes on PM Modiji

महत्त्वाच्या बातम्या

Array

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात