राहुल गांधी – भाजप खासदार कमलेश पासवान यांची राजकीय जुगलबंदी आजही सुरू!!


विशेष प्रतिनिधी

नवी दिल्ली : काँग्रेसचे वरिष्ठ नेते खासदार राहुल गांधी आणि भाजपचे तरुण खासदार कमलेश पासवान यांच्यातील राजकीय जुगलबंदी काल संसदेतल्या बजेट भाषणावरून सुरू झाली ती आजही सुरू असून खासदार कमलेश पासवान यांनी काँग्रेस पक्षावर आणि राहुल गांधींवर पलटवार केला आहे. Rahul Gandhi – BJP MP Kamlesh Paswan’s political juggling continues today !!

राहुल गांधी यांनी बजेट वरील भाषणात खासदार कमलेश पास्वान यांची स्तुती केली होती. कमलेश पासवान यांनी बजेटवर उत्तम भाषण केले. पण त्यांनी चुकीच्या गोष्टीचे समर्थन केले. ते उत्तम दलित नेते आहेत. पण ते चुकीच्या पक्षात आहेत, असा टोला राहुल गांधी यांनी आपल्या बजेट वरील लोकसभेतल्या भाषणात लावला होता.

या टोल्याला कमलेश पासवान यांनी प्रत्युत्तर दिले होते. मी दलित समाजातून आलेला नेता आहे. भाजपने मला तीन वेळा तिकीट देऊन लोकसभेत पाठवले आहे. काँग्रेस नेत्यांमध्ये एवढी क्षमता नाही की ते आपल्या पक्षात मला खेचून नेतील, असा प्रतिटोला कमलेश पासवान लगावला होता. आज देखील कमलेश पासवान यांनी आपल्यासारख्या दलित नेत्याला काँग्रेसमध्ये ओढण्याचा त्यांनी प्रयत्न करू नये. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना काँग्रेसने कशी वर्तणूक दिली हे सगळ्या जगाला माहिती आहे. बाबासाहेबांचा लोकसभा निवडणुकीत पराभव करण्यासाठी काँग्रेसने जंग जंग पछाडले होते, याची आठवण काँग्रेसच्या नेत्यांना करून दिली आहे.

– कोण आहेत कमलेश पासवान कमलेश?

कमलेश पासवान हे उत्तर प्रदेशातील बांसगाव लोकसभा मतदार मतदारसंघाचे प्रतिनिधित्व करतात. ते पूर्वी समाजवादी पक्षाचे आमदार होते. परंतु 2009 मध्ये त्यांनी भाजपमध्ये प्रवेश करून पहिल्यांदा लोकसभेची निवडणूक जिंकली. त्यानंतर 2014 आणि 2019 अशा सलग दोन निवडणुकांमध्ये भाजपच्या तिकिटावर त्यांनी बांसगाव मतदारसंघातून निवडणूक जिंकली आहे. सलग तीन वेळा ते भाजपचे खासदार राहिले आहेत. त्यामुळे त्यांनी भाजपने आपल्याला तीन वेळा संसदेत पाठवले आहे, असे राहुल गांधी यांना प्रत्युत्तर दिले आहे.

Rahul Gandhi – BJP MP Kamlesh Paswan’s political juggling continues today !!

महत्त्वाच्या बातम्या

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*    मंत्रालयात प्रवेशद्वाराजवळ महात्मा फुले, सावित्रीबाई फुले यांच्या तैलचित्राचे अनावरण भारतात आता एक देश एक चार्जर जलयुक्त शिवार योजना पुन्हा चालू होणार; शिंदे – फडणवीस सरकारचा महत्त्वाचा निर्णय