Assembly Election Results : कॉंग्रेसचे नेते राहुल गांधी यांनी चार राज्ये आणि एक केंद्र शासित प्रदेश पुडुचेरी येथे झालेल्या पराभवानंतर कार्यकर्त्यांचे आभार मानले. राहुल गांधी म्हणाले की, मी जनतेचा निर्णय स्वीकारतो आणि आपल्या कार्यकर्त्यांचे तसेच कॉंग्रेसचे समर्थन करणाऱ्या लाखो लोकांचे आभार मानतो. Rahul Gandhi Accepts Defeat Of Congress After Assembly Election Results Of Five States
विशेष प्रतिनिधी
नवी दिल्ली : कॉंग्रेसचे नेते राहुल गांधी यांनी चार राज्ये आणि एक केंद्र शासित प्रदेश पुडुचेरी येथे झालेल्या पराभवानंतर कार्यकर्त्यांचे आभार मानले. राहुल गांधी म्हणाले की, मी जनतेचा निर्णय स्वीकारतो आणि आपल्या कार्यकर्त्यांचे तसेच कॉंग्रेसचे समर्थन करणाऱ्या लाखो लोकांचे आभार मानतो.
राहुल यांनी ट्वीट केले की, ‘आम्ही सार्वजनिक आदेश नम्रपणे स्वीकारत आहोत. हजारो कार्यकर्ते आणि लक्षावधी ज्यांनी आम्हाला प्रत्यक्ष समर्थन दिले त्यांचे आभार. आम्ही आमची मूल्ये आणि आदर्शांसाठी संघर्ष सुरू ठेवू. जय हिंद.’
We humbly accept the people’s mandate. Sincere gratitude to our workers & the millions of people who supported us on the ground. We will continue to fight for our values and ideals. Jai Hind. — Rahul Gandhi (@RahulGandhi) May 2, 2021
We humbly accept the people’s mandate. Sincere gratitude to our workers & the millions of people who supported us on the ground.
We will continue to fight for our values and ideals.
Jai Hind.
— Rahul Gandhi (@RahulGandhi) May 2, 2021
यापूर्वी कॉंग्रेस पक्षानेही निवडणुकीतील पराभवाची कबुली दिली आणि म्हटले की, आम्ही चुका सुधारू. पक्षाचे मुख्य प्रवक्ते रणदीप सुरजेवाला यांनीही यावर जोर दिला की, राष्ट्रीय पातळीवर कॉंग्रेसच एकमेव भक्कम पर्याय आहे.
आसाम आणि केरळमध्ये कॉंग्रेस सत्तेत परतू शकली नाही, तेथे ते मुख्य विरोधी पक्ष होते. पश्चिम बंगालमध्ये तर त्यांचा सुपडासाफ झाला. पुडुचेरीतही पराभव झाला. तामिळनाडूमध्ये द्रमुकच्या नेतृत्वाखालील कॉंग्रेसची युती विजयाच्या दिशेने आहे.
Rahul Gandhi Accepts Defeat Of Congress After Assembly Election Results Of Five States
महत्त्वाच्या बातम्या
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App