Tamil nadu Assembly Election 2021 Result Analyses : सरकारविरोधातील रोषामुळे द्रमुकला यशप्राप्ती; स्टॅलिन यांच्या नेतृत्वावर जनतेचा पुन्हा विश्वास

विशेष प्रतिनिधी

चेन्नई : तमिळनाडूमध्ये विधानसभेच्या निवडणुकीच्या मतमोजणीत राज्यात सत्तांतर होणार असल्याचे स्पष्ट झाले. द्रमुकच्या या विजयाचे श्रेय माजी मुख्यमंत्री दिवंगत करुणानिधी यांचे पुत्र एम. के. स्टॅलिन यांना जाते. द्रमुकच्या विजयाची काही करणे.. Tamil nadu Assembly Election 2021 Result Analyses

 •  दर पाच वर्षांनी सत्तांतर करायचेच, हा अलिखित नियम जनतेने पुन्हा पाळला आहे.
 • 2011 पूर्वी करुणानिधी यांच्या निधनानंतर एम. के स्टॅलिन यांच्या नेतृत्वात सत्ता आली होती. आता सरकार विरोधातील रोष (अँटी इंनकंबन्सी फॅक्टर) जनतेने मतदानातून व्यक्त केला.
 •  2016 मध्ये अद्रमुकची सत्ता आली. 2018 मध्ये जयललिता उर्फ अम्मा यांचे निधन झाले. त्यानंतर सत्ता प्राप्तीसाठी अद्रमुकमध्ये संघर्ष उडाला. अखेर के. पलानीस्वामी हे मुख्यमंत्री झाले. पक्षातील असंतोष जयललितांची उणीव यामुळे अद्रमुकवरचा विश्वास उडाला.
 •  राज्याला खंबीर नेतृत्व देऊ शकतो, हा विश्वास
  स्टॅलिन यांनी जनतेत निर्माण केला.
 •  करुणानिधी यांचे खरे वारसदार आणि त्यांची कार्यशैली आपल्यात असल्याचे स्टॅलिन यांनी जनतेत ठासविले.
 •  कृषी कायदे आणि नागरिकत्व कायद्याविरोधात भूमिका घेऊन भाजपला टार्गेट करताना अद्रमुकचे मतदान द्रमुकने आपल्याकडे वळविले.
 •  विरोधकांकडे विशेषतः अद्रमुककडे जनतेला आकर्षित करणारे नेतृत्व नव्हते
 • सायंकाळी सात वाजेपर्यंत मतमोजणी तपशील
 •  द्रमुक : 42 जागा जिंकल्या असून 111 जागांवर आघाडी घेतली आहे.
 •  अद्रमुक : 10 जागा जिंकल्या असून 71 जागांवर आघाडी घेतली आहे.
 •  इतर पक्ष : 00

तामिळनाडू विधानसभा निवडणूक आघाडीवर असलेले उमेदवार (मतदारसंघ) :

मुख्यमंत्री पलानीस्वामी (एडप्पाडी), उपमुख्यमंत्री ओ. पन्नीरसेल्वम (बोडीनायककनूर), स्टॅलिन (कोलाथुर), त्याचा मुलगा उधयानिधी स्टॅलिन (चेपाक-तिरुवल्लीकेंनी), एमएनएम संस्थापक कमल हसन (कोयांबटूर), पीएमकेचे जी. के. मणी (पेनगाराम)

पिछाडीवर असलेले उमेदवार (मतदारसंघ) :

डीएमडीके कोषाध्यक्ष आणि विजयाकांत यांची पत्नी प्रेमलता (वृद्धाचलम), भाजपा अध्यक्ष एल. मुरुगन (धारापुरम), अभिनेत्री खुशबू सुंदर ( थाऊजंट लाइट्स), तामिळनाडू भाजपाचे उपाध्यक्ष के. अन्नमलाई (अरावकुरीची) आणि सीमन (तिरुवोत्रीयुर).

Tamil nadu Assembly Election 2021 Result Analyses

महत्त्वाच्या बातम्या