गड आला, पण सिंह गेला..: बंगाल एकहाती जिंकणाऱ्या ममता बॅनर्जींचा नंदीग्रामात पराभव!


  • या ऐतिहासिक विजयानंतरही ममतांचा निवडणूक आयोगावर निशाणा; सुप्रिम कोर्टाच्या घटनापीठाकडे दाद मागण्याचा इशारा, नंदीग्राममधून हरल्याची कबूली
  • मोदी मॅजिक नाही चालली… स्थानिक नेतृत्वाचा अभाव बंगालमध्ये पराभव देऊन गेला

विशेष प्रतिनिधी

कोलकाता – पश्चिम बंगालमध्ये विधानसभेच्या निवडणूकीत ऐतिहासिक विजयानंतर मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी आज निवडणूक आयोगावर थेट निशाणा साधला. त्याचवेळी ममतांनी नंदीग्राममध्ये आपला सुवेंदू अधिकारींनी केलेला पराभव मान्य केला. आधी ममता दमत – भागत १२०० मतांनी जिंकल्याची बातमी एएनआय वृत्तसंस्थेने जाहीर केले होते. पण प्रेस कॉन्फरन्समध्ये ममतांनी आपला स्वतःचा पराभव मान्य केला. mamata banerjee lost in nandigram, very big win for TMC in west bengal

एकीकडे हा विजय बंगाली माणसाचा, भारतीयांचा आणि लोकशाहीचा आहे, असे त्या म्हणाल्या. त्याचवेळी त्यांनी निवडणूक आयोगावर भाजपचा एजंट असल्यासारखा वागल्याचा आरोप केला. निवडणूक आयोगाविरोधात सुप्रिम कोर्टाच्या घटनापीठाकडे दाद मागण्याचा इशाराही त्यांनी दिला.



ऐतिहासिक विजयानंतर पत्रकार परिषदेत त्या बोलत होत्या. निवडणूकीत जे आरोप ममतांनी भाजपवर लावले. त्या सगळ्या आरोपांचा त्यांनी पुनरूच्चार केला. त्याच वेळी त्यांनी लोकशाही, राज्यघटना स्पिरीटचा उल्लेख केला. बंगालमध्ये भाजपने धार्मिक फूट पाडण्याचा प्रयत्न केला. त्यांनी मनी, मसल, माफिया पॉवरचा वापर करून निवडणूक लढविली. पण बंगाली जनतेने त्यांचा पराभव केल्याचे वक्तव्य ममतांनी केले.

एकाच वेळी त्या मी काही विसरणार नाही, असे म्हणाल्या आणि पुढचेच विधान त्यांनी सगळे विसरून पुढे वाटचाल करणार असल्याचेही त्यांनी सांगितले. केंद्र सरकारकडे त्यांनी संपूर्ण देशातील कोरोना लसीकरणासाठी ३० हजार कोटींची मागणी केली. ही रक्कम केंद्र सरकारला अजिबात ज़ड नाही, असे विधानही त्यांनी केले.

mamata banerjee lost in nandigram, very big win for TMC in west bengal

महत्त्वाच्या बातम्या

Array

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात