पंढरपूरकरांनी केला “करेक्ट कार्यक्रम”; देवेंद्र फडणवीस यांचा राष्ट्रवादीवर निशाणा


विशेष प्रतिनिधी

मुंबई : भाजपचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी प्रचारसभेत ‘तुम्ही भाजपच्या उमेदवाराला जास्त मत देऊन यांचा करेक्ट कार्यक्रम करा, मी राज्यात “यांचा” कार्यक्रम करतो’ असे आवाहन केले होतं. अखेर फडणवीसांच्या आवाहनाला पंढरपूरकारांनी हाक देत राष्ट्रवादीला आस्मान दाखवले आहे. Devendra fadanavis targets NCP over pandharpur defeat

समाधान आवताडे यांनी 3716 मतांनी विजय मिळवला आहे. राष्ट्रवादीचे उमेदवार आणि भारत भालके यांचा मुलगा भगीरथ भालके यांना पराभवाचा सामना करावा लागला आहे.

आज सकाळी 8 वाजेपासून मतदानाला सुरुवात झाली आहे. टपाली मतदानात समाधान आवताडे यांनी आघाडी घेतली होती. मधल्या काही फेरीत आवताडे हे मागे पडले होते. पण समाधान आवताडे यांनी नंतर आघाडी घेतली ती 36 व्या फेरीपर्यंत कायम राहिली. नंतर याचे रुपांतर विजयात झाले आहे.



भगीरथ भालके आणि समाधान आवताडे यांच्यामध्ये कडवी झुंज सुरू होती. कधी राष्ट्रवादी पुढे तर कधी भाजप आघाडी घेत होती. एकूण 38 फेऱ्यांमध्ये मतमोजणी पूर्ण झाली. 7 व्या फेरीपासूनच समाधान आवताडे यांनी जोरदार मुसंडी मारली आणि मोठी आघाडी मिळवली. अखेरच्या फेरीअखेर समाधान आवताडे यांना विजयी घोषित करण्यात आले. राष्ट्रवादीने पंढरपूरमध्ये झालेला पराभव स्विकारला आहे. हा धनशक्तीचा विजय असल्याची टीकाही राष्ट्रवादीचे नेते लतिफ तांबोळी यांनी केली.

आतापर्यंतचा निकाल

  • पहिल्या फेरीत भाजपचे समाधान आवताडे ४५० मतांनी आघाडीवर
  •  दुसऱ्या फेरीअखेर भाजपचे समाधान आवताडे 114 तर भगीरथ भालके 114 मतं, समसमान मतं
  •  तिसऱ्या फेरीत 635 मतांनी भगीरथ भालके पुढे
  •  4 थ्या फेरीअखेर समाधान आवताडे 11303, भगीरथ भालके 11941, भालके 638 ने आघाडीवर
  •  5 फेऱ्या पूर्ण भगीरथ भालके 521मतांनी आघाडीवर.
  •  7 व्या फेरी अखेर भाजपचे समाधान आवताडे 100मतांनी आघाडीवर.
  •  8 व्या फेरी अखेर भाजपचे समाधान आवताडे 2295मतांनी आघाडीवर
  •  11 व्या फेरी अखेर भाजपचे समाधान आवताडे 1503मतांनी आघाडीवर.
  •  12 व्या फेरी अखेर भाजपचे समाधान आवताडे 1409मतांनी आघाडीवर
  •  16 व्या फेरीअखेर समाधान आवताडे 1411 मतांची आघाडीवर
  •  17 व्या फेरी अखेर ९०१ मतांनी भाजपचे समाधान आवताडे आघाडीवर
  •  18 व्या फेरी अखेर भाजपचे समाधान आवताडे 1209 मतांनी आघाडीवर
  •  19 व्या फेरी अखेर भाजपचे समाधान आवताडे 1022मतांनी आघाडीवर
  •  21 व्या फेरी अखेर भाजपचे समाधान आवताडे 3486मतांनी आघाडीवर
  •  22 व्या फेरी अखेर भाजपचे समाधान आवताडे 3908 मतांनी आघाडीवर
  •  23 व्या फेरी अखेर भाजपचे समाधान आवताडे 5807 मतांनी आघाडीवर
  •  25 व्या फेरी अखेर भाजपचे समाधान आवताडे 6200मतांनी आघाडीवर
  •  36 व्या फेरी अखेर भाजपचे समाधान आवताडे 4256 मतांनी आघाडीवर
  •  भाजपचे समाधान आवताडे 3716 मतांनी विजयी

Devendra fadanavis targets NCP over pandharpur defeat

महत्त्वाच्या बातम्या

Array

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात