Pandharpur Election Result 2021 Live : पंढरपूरमध्ये १५ व्या फेरीअखेर भाजपचे समाधान आवताडे आघाडीवर, भगीरथ भालके पिछाडीवर

प्रतिनिधी

पंढरपूर : पंढरपूर – मंगळवेढा मतदारसंघात राष्ट्रवादी – भाजप उमेदवारांचे पारडे सारखे खाली – वर होत आहे. पहिल्या तीन टप्प्यांमध्ये भाजपचे समाधान आवताडे आघाडीवर असताना चौथ्या फेरीत भगीरथ भालकेंनी आघाडी घेतली. आता १५ व्या टप्प्यात भाजपच्या समाधान आवताडे यांनी ३८०० मतांची आघाडी घेतली आहे.Pandharpur Election Result 2021 Live, samadhan awatade leading by 3800 votes

भगीरथ भालकेंना वडिलांच्या निधनानंतर सहानुभूतीच्या लाटेचा फायदा मिळाल्याचे मानले जाते. एकूण २ लाख ३२ हजार मतदान झाले आहे. त्यामुळे १५ व्या फेरीनंतरही चित्र स्थिर राहील हे सांगणे कठीण आहे. दोन्ही उमेदवारांचे पारडे सारखे खाली – वर जाताना दिसत आहे.पंढरपूर शहर आणि मंगळवेढा शहर येथील मतमोजणीचे मोठे आकडे समोर यायला सुरूवात झाली आहे. ज्यात दोन्ही उमेदवारांची खऱ्या अर्थाने परीक्षा सुरू आहे. पंढरपूर शहरात भाजप – परिचारक परिवाराचे वर्चस्व आहे.

मंगळवेढ्यात भालके परिवाराला मोठा पाठिंबा असल्याचे मानले जाते. दोन्ही शहरांमधील मतदान कोणाच्या पारड्यात किती प्रमाणात जाते, यावर भगीरथ भालके आणि समाधान आवताडे यांचे भवितव्य अवलंबून आहे. शैला गोडसे यांची बंडखोरी अजून तरी भालकेंसाठी मोठी डोकेदुखी ठरताना दिसलेली नाही.

Pandharpur Election Result 2021 Live, samadhan awatade leading by 3800 votes

महत्त्वाच्या बातम्या