Pandharpur Election Result 2021 Live : पंढरपूरमध्ये पोस्टल गणना सुरू, अवताडे Vs भालकेंमध्ये कांटे की टक्कर! पाहा अपडेट्स

Pandharpur Election Result 2021 Live Bhagirath Bhalke vs Samadhan Autade

Pandharpur Election Result 2021 Live : येथील दिवंगत आमदार भारत भालके यांच्या निधनाने रिक्त झालेल्या जागेवर विधानसभा निवडणुकीची मतमोजणी सुरू आहे. भारत भालके हे राष्ट्रवादीचे आमदार होते. ही निवडणूक राष्ट्रवादीसह भाजपने प्रतिष्ठेची केलेली असल्याने अवघ्या राज्याचे निकालाकडे लक्ष आहे. या निवडणुकीत राष्ट्रवादीचे उमेदवार भारत भालके यांचे सुपुत्र भगीरथ भालके विजयी होणार की भाजपचे समाधान आवताडे याची सर्वांनाच उत्सुकता आहे. Pandharpur Election Result 2021 Live Bhagirath Bhalke vs Samadhan Autade


विशेष प्रतिनिधी

पंढरपूर : येथील दिवंगत आमदार भारत भालके यांच्या निधनाने रिक्त झालेल्या जागेवर विधानसभा निवडणुकीची मतमोजणी सुरू आहे. भारत भालके हे राष्ट्रवादीचे आमदार होते. ही निवडणूक राष्ट्रवादीसह भाजपने प्रतिष्ठेची केलेली असल्याने अवघ्या राज्याचे निकालाकडे लक्ष आहे. या निवडणुकीत राष्ट्रवादीचे उमेदवार भारत भालके यांचे सुपुत्र भगीरथ भालके विजयी होणार की भाजपचे समाधान आवताडे याची सर्वांनाच उत्सुकता आहे.

दुसरीकडे, पंढरपूरमध्ये मतमोजणीला अंतिम निकाल येण्यास 12 तास लागण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. सकाळी आठ वाजेपासून पंढरपूर विधानसभा मतदारसंघ पोटनिवडणुकीसाठी मतमोजणीला सुरुवात झाली आहे. तथापि, अंतिम निकाल हाती येण्यास 12 तास लागण्याची शक्यता आहे.

तत्पूर्वी, मतमोजणी प्रतिनिधींना पीपीई किट पुरवण्यात आले आहेत. कोरोना संसर्ग पार्श्वभूमीवर ही मतमोजणी होत असल्याने खबरदारी घेण्यात येत आहे. मतमोजणी केंद्रावर पोलिसांचा कडेकोट बंदोबस्त आहे.

एक्झिट पोलनुसार अवताडे मारणार बाजी

पुण्याच्या ‘द स्ट्रेलेमा’ या संस्थेने एक्झिट पोल जाहीर केले आहेत. भगीरथ भालके यांना 95508, समाधान आवताडे यांना 98946, अपक्ष उमदेवार सिद्धेश्वर आवताडे यांना 7124, स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे सचिन शिंदे यांना 8619, अपक्ष उमेदवार शैला गोडसे यांना 6596 आणि इतरांना 8693 मते मिळणार असल्याचे भाकित त्यांनी केले होते. एक्झिट पोलनुसार समाधान आवताडे हे 3438 मताधिक्य घेऊन विजयी होणार असल्याचं सांगण्यात येतंय. परंतु आज प्रत्यक्ष निकालात काही उलटफेर होतात की अवताडेच बाजी मारणार याकडे अवघ्या राज्याचं लक्ष लागलेलं आहे.

Pandharpur Election Result 2021 Live Bhagirath Bhalke vs Samadhan Autade

महत्त्वाच्या बातम्या

Tamil nadu Assembly Election 2021 Result : कमल हासन दक्षिण कोयंबतूर जिंकणार का ?; डॉ. संतोष बाबू यांचा वेलाचेरीतील विजयाकडे लक्ष

West Bengal Assembly Election 2021 Result Live : नंदीग्रामकडे अवघ्या देशाचे लक्ष.. ‘गड’ आणि ‘सिंह’ दोघेही शाबूत राहतील? शुभेंदू ‘जायंट किलर’ ठरतील?

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*    वेदांत – फॉक्सकॉन सेमी कंडक्टर प्रकल्पाचे सर्वेसर्वा अनिल अग्रवाल यांचे महत्वाचे मुद्दे वनडे फॉरमॅटमधून ऑस्ट्रेलियन क्रिकेटर ॲरॉन फिंचची निवृत्ती भारत बनला 5वी सर्वात मोठी अर्थव्यवस्था