West Bengal Assembly Election 2021 Result Live : नंदीग्रामकडे अवघ्या देशाचे लक्ष.. ‘गड’ आणि ‘सिंह’ दोघेही शाबूत राहतील? शुभेंदू ‘जायंट किलर’ ठरतील?


विशेष प्रतिनिधी

कोलकाता : बंगालच्या मुख्यमंत्री आणि सत्ताधारी तृणमूल काँग्रेसच्या प्रमुख ममता बॅनर्जी यांनी मेदिनीपूर जिल्ह्यातल्या नंदीग्राम मतदारसंघातून निवडणूक लढवण्याची घोषणा केली .त्यांचा हा निर्णय म्हणजे मास्टरस्ट्रोक असल्याचं राजकीय वर्तुळात बोललं जात आहे. पण, शुभेंदू अधिकारी यांच्या साहाय्यानं या भागात सत्ता प्रस्थापित करण्याच्या भाजपच्या मनसुब्यांना उद्ध्वस्त करण्यासाठी बॅनर्जी यांनी असा निर्णय घेतला अशीही चर्चा रंगली. West Bengal Assembly Election 2021 Result Live Country breathlessly watching nandigram battle

ममता यांची नंदीग्राममधून निवडणूक लढवण्यामागे अनेक कारणं आहेत. नंदीग्राम हे फक्त गाव नसून पश्चिम बंगालच्या राजकारणात बदलाचं प्रतीक आहे. २००७ मध्ये इथं भूसंपादन कायद्याविरोधातील आंदोलनादरम्यान पोलिसांनी फायरिंग केल्यामुळे १४ जणांचा मृत्यू झाला होता. त्यावेळी ही जागा जगभरात चर्चेचा विषय ठरली होती.

याच आंदोलनानं राज्यातील डाव्या संघटनांची तीन दशकांची सत्ता संपुष्टात आली आणि ममता यांच्यासाठी सत्तेची वाट मोकळी करून दिली. आता १४ वर्षांनंतर ही जागा पुन्हा एकदा चर्चेच्या केंद्रस्थानी आहे. आता मात्र नंदीग्राम वेगळ्या कारणांनी चर्चेत आहे. एकेकाळी ममता यांचा उजवा हात असलेले आणि आंदोलनाची रुपरेषा ठरवून नंदीग्रामला जगभरात पोहोचवणारे शुभेंदू अधिकारी यावेळी मात्र भाजपमध्ये सहभागी झाले आहेत. त्यांच्या साहाय्यानं बंगालमध्ये सत्ता काबीज करायचा भाजपचा प्रयत्न आहे. पण, आता त्याच शुभेंदू यांच्या किल्ल्यात ममता बॅनर्जी यांनी स्वत: निवडणूक लढायचं जाहीर केलं आहे.

एक कारण हे ही आहे ते म्हणजे ज्या शुभेंदू अधिकारी यांचा हात पकडून भाजप बंगालमध्ये सत्ता मिळवू पाहत आहेत, त्या अधिकारी यांना त्यांच्याच घरात ममता यांनी घेरलं आहे. गेल्या लोकसभा निवडणुकीत 18 जागा जिंकत भाजपनं बंगालमध्ये टीएमसीला झटका दिला होता. असं असलं तरी झारखंड नजीकच्या भागात भाजपची कामगिरी खराब राहिली. याचं एक कारण हे होतं की या भागात भाजपकडे ममता किंवा शुभेंदू यांच्या तोडीचा नेता नव्हता.

आता शुभेंदू यांना आपल्याकडे खेचून भाजप या भागात सत्ता स्थापन करू पाहत आहे. पण, ममता यांच्या घोषणेमुळे भाजपला आव्हान दिलं आहे. भाजप शुभेंदू यांचा पुरेपूर वापर करू पाहत आहे. यामुळे आता ते दुसऱ्या जागेवरून लढतील, असा अंदाज बांधला जात आहे. शुभेंदू दक्षिण बंगालमध्ये पक्षाची मूळं मजबूत करतील, अशी भाजपला आशा होती. पण आता शुभेंदू यांची वाट खडतर राहणार आहे.

दुसरं कारण हे आहे की, यावेळेच्या विधानसभा निवडणुकीत धार्मिक ध्रुवीकरण होण्याची मोठी शक्यता आहे. अशात जर ममता बॅनर्जी मेदिनीपूर जिल्ह्यातल्या मागास भागातून निवडणुकीला सामोरं जात असतील, तर त्यांना भाजपच्या बाजूनं होणाऱ्या हिंदू मतदारांच्या ध्रुवीकरणावर नियंत्रण मिळवणं शक्य होऊ शकतं. पूर्व मेदिनीपूर जिल्ह्यात मुस्लीम जवळपास १४.६ टक्के आहेत. पण, नंदीग्राममध्ये मात्र मुस्लीम मतदारांची संख्या निर्णायक आहे. 2011 सालच्या जनगणनेनुसार, नंदीग्राम ब्लॉक-1, ब्लॉक-2 आणि नंदीग्राम कस्बा येथील मुस्लिमांची संख्या अनुक्रमे 34, 12.1 आणि 40.3 टक्के होती. गेल्या 10 वर्षांत ही संख्या वाढली आहे.

गेल्या तीन निवडणुकांचे निकाल पाहिले तर नंदीग्राममधील मुस्लीम मतदारांची भूमिका अत्यंत महत्त्वाची ठरल्याचं दिसून येतं. 2006 सालच्या विधानसभा निवडणुकीत इथं पहिल्या आणि दुसऱ्या क्रमांकावर मुस्लीम उमेदवार होते. तेव्हा विजयी आणि पराभूत उमेदवारामधील मतांचं अंतर 3.4 टक्के इतकं होतं.

२०११ मध्ये टीएमसीटच्या मुस्लीम उमेदवारानं सीपीआयच्या हिंदू उमेदवाराचा पराभव केला होता. पण, विजयी आणि पराभूत उमेदवारामधील मतांचं अंतर 26 टक्के इतकं होतं. २०१६मध्ये या जागेवर शुभेंदू अधिकारी यांना २०११मध्ये टीएमसीला मिळालेल्या मतांपेक्षा 7 टक्के अधिक मतं मिळाले होते. त्यावेळी सीपीआयनं इथं एक मुस्लीम उमेदवार दिला होता.

ममता यांनी नंदीग्राममधून लढण्याचा निर्णय घेतला नसता, तर टीएमसीनं इथून मुस्लीम उमेदवारच दिला असता, असं जाणकार सांगतात. त्या परिस्थितीत भाजपला नंदीग्राम आणि परिसरात हिंदू मतदारांच्या ध्रुवीकरणास मदत मिळाली असती. पण, आता ममता यांच्या निर्णयामुळे भाजपच्या डावपेचांना फटका बसला आहे. ममता बॅनर्जी दक्षिण कोलकात्यातल्या भवानीपूर मतदारसंघातून निवडणूक लढवत आल्या आहेत. आता नंदीग्राम निवडण्यामागे एक कारण असंही सांगितलं जात आहे की, यावेळेस भवानीपूर मतदारसंघात बाजी मारणं ममता यांच्यासाठी सोपं नव्हतं.

राजकारणाच्या सर्व बाबी सोडून ममतांनी नंदीग्राममध्ये भाजपच्या हिंदुत्व कार्डाला उत्तर देण्यास सुरुवात केली आहे. आतापर्यंत भाजपाने ममतांची मुस्लिम तुष्टीची प्रतिमा तयार केली आहे, ममता बॅनर्जी नंदीग्राम रॅलीच्या मंचावरील चंडी मजकूराची उक्ती, मंदिरांचे परिक्रमा आणि शिवरात्रीला जाहीरनामा देण्याचे विधान ममतांच्या रणनीतीत स्पष्ट बदल दर्शविणारे आहेत. भाजपा या क्षेत्राच्या सत्तर टक्के बहुमताच्या मताधिक्याने विजय मिळवू इच्छित होता. आता ममता आपल्या धार्मिक बांधिलकी व्यक्त करुन आणि स्वत: ला ब्राह्मणची मुलगी म्हणून वर्णन करून आपली प्रतिमा बदलण्याचा प्रयत्न करीत आहेत, जी नंदिग्रामला हिंदुत्वाच्या नव्या प्रयोगशाळेत रूपांतर करीत असल्याचे दिसते.

भारतीय लोकशाहीसाठी हा विडंबनाचा विषय असेल की नंदीग्राममध्ये जेथे विकास आणि तळागाळातील प्रश्नांवर मते मागितली जातात, तेथे धार्मिक ध्रुवीकरणाचा अवलंब करून निवडणुका जिंकण्यासाठी प्रयत्न केले जात आहेत. भारतीय लोकशाहीसाठी हे एक शुभ चिन्ह संकेत म्हणता येणार नाही. निसंशयपणे, ममता बॅनर्जी समोर आतापर्यंतचे सर्वात मोठे आव्हान आहे, की आपल्या कार्यकाळाच्या दशकानंतर, आपल्या आक्रमक निवडणूक रणनीतीसह देशभरात विजयासाठी प्रचार करीत असलेल्या भाजप पक्षाचा सामना करीत आहेत. केंद्रीय सत्तेत असण्याचा फायदा भाजपला आहे. परंतु असे असूनही, त्यांच्या आक्रमक वृत्ती आणि अतिरेकी राजकारणासाठी प्रसिद्ध असलेल्या ममता बॅनर्जी हे सोपे राजकारणी नाहीत. पश्चिम बंगालमध्ये डाव्या सत्तेच्या तीन दशकांहून अधिक सत्तेचा कालखंड संपविला आणि काँग्रेसविरूद्ध निर्णायक विजय मिळविणार्‍या ममता बॅनर्जी यांना राजकारणाची सर्व बाजू उत्तम प्रकारे अवगत आहे. आणि त्या सर्व रणनिती भाजपाविरुद्ध वापरत आहेत.

आत्तापर्येंत ममता बॅनर्जी भवानीपूर विधानसभा मतदारसंघातून निवडणूक लढवत आल्या आहेत. मी भवानीपूरच्या जनतेच्या भावनेची उपेक्षा करू शकत नाही, असंही ममता यांनी म्हटलं आहे. शुभेंदू अधिकारी यांचं नाव न घेता ममता बॅनर्जी यांनी म्हटलं की, “पक्ष सोडून गेलेल्या नेत्यांची चिंता करू नका. ज्यावेळी टीएमसी पक्ष निर्माण झाला, त्यावेळी हे नेते पक्षात नव्हते.” ममता यांनी म्हटलं, “मी नेहमीच नंदीग्रामहून निवडणूक मोहिमेची सुरुवात केली आहे. ही जागा माझ्यासाठी लाभदायी ठरली आहे. काही जण बंगालला भाजपच्या हातात विकू पाहत आहेत. पण, मी असं होऊ देणार नाही. टीएमसी सोडणारे देशाचे राष्ट्रपती तसंच उपराष्ट्रपती होऊ शकतात. पण, मी जिवंत असेपर्यंत बंगालची भाजपच्या हातानं विक्री होऊ देणार नाही.”

West Bengal Assembly Election 2021 Result Live Country breathlessly watching nandigram battle

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*    India’s Cheapest Electric Car Launched Tata Tiago EV From Just 8.49 Lakhs; वेदांत – फॉक्सकॉन सेमी कंडक्टर प्रकल्पाचे सर्वेसर्वा अनिल अग्रवाल यांचे महत्वाचे मुद्दे वनडे फॉरमॅटमधून ऑस्ट्रेलियन क्रिकेटर ॲरॉन फिंचची निवृत्ती