Rahul Bajaj Passes Away: उद्योगपती राहुल बजाज यांचे निधन, उद्योगजगतावर शोककळा, गडकरींनीही जागवल्या आठवणी


Rahul Bajaj Passes Away Industrialist Rahul Bajaj Profile । बजाज ग्रुपचे माजी अध्यक्ष आणि बजाज मोटर्सचे संस्थापक राहुल बजाज यांचे वयाच्या ८३व्या वर्षी निधन झाले. दीर्घकाळापासून त्यांची कर्करोगाशी झुंज सुरू होती. राहुल बजाज यांचा जन्म 10 जून 1938 रोजी कोलकाता येथे झाला. राहुल बजाज हे मारवाडी व्यापारी कुटुंबातील होते. राहुल बजाज यांनी बजाज समूहाची जबाबदारी दीर्घकाळ सांभाळली. 1965 मध्ये त्यांनी बजाजची कमान आपल्या हातात घेतली होती.Rahul Bajaj Passes Away: Death of industrialist Rahul Bajaj, mourning over business world, memories of Gadkari


वृत्तसंस्था

मुंबई : बजाज ग्रुपचे माजी अध्यक्ष आणि बजाज मोटर्सचे संस्थापक राहुल बजाज यांचे वयाच्या ८३व्या वर्षी निधन झाले. दीर्घकाळापासून त्यांची कर्करोगाशी झुंज सुरू होती.

प्रसिद्ध उद्योगपती राहुल बजाज यांच्या निधनावर काँग्रेस नेते अभिषेक सिंघवी म्हणाले की, मी त्यांना अनेक दशकांपासून ओळखतो. ते आमचे कौटुंबिक मित्र होते. त्यांनी आणि मी राज्यसभेतही अनेक क्षण घालवले आहेत. याशिवाय अधिवेशन काळात आणि सेंट्रल हॉलमध्येही चर्चा झाली. काही महिन्यांपूर्वीच मी त्यांच्याशी ३० मिनिटे संभाषण केले होते.

केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनीही त्यांच्या निधनावर शोक व्यक्त केला आहे. त्यांनी ट्विटमध्ये लिहिले की, ‘उद्योगपती, समाजसेवी आणि बजाजचे माजी अध्यक्ष राहुल बजाज यांना माझी भावपूर्ण श्रद्धांजली. पद्मभूषण पुरस्कार विजेते राहुल यांच्याशी माझे अनेक वर्षांपासून वैयक्तिक संबंध आहेत. गेल्या पाच दशकांपासून बजाज समूहाचे नेतृत्व करणाऱ्या राहुलजींनी उद्योगक्षेत्रात महत्त्वपूर्ण योगदान दिले आहे. ईश्वर दिवंगत आत्म्याला शांती देवो आणि कुटुंबीयांना शक्ती देवो.

मुंबई काँग्रेसने ट्वीट केले की, राहुल बजाज यांच्या कुटुंबीय आणि मित्रांसोबत आम्ही शोक व्यक्त करतो. ईश्वर त्यांच्या आत्म्याला शांती देवो.

कोण होते राहुल बजाज?

राहुल बजाज यांचा जन्म 10 जून 1938 रोजी कोलकाता येथे झाला. राहुल बजाज हे मारवाडी व्यापारी कुटुंबातील होते. राहुल बजाज यांनी बजाज समूहाची जबाबदारी दीर्घकाळ सांभाळली. 1965 मध्ये त्यांनी बजाजची कमान आपल्या हातात घेतली होती.

राहुल बजाज जवळपास ५० वर्षे बजाज समूहाचे अध्यक्ष होते. 2001 मध्ये त्यांना पद्मभूषण पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. राहुल बजाज हे स्वातंत्र्यसैनिक जमनालाल बजाज यांचे नातू होत. त्यांनी दिल्लीतील सेंट स्टीफन्स कॉलेजमधून शिक्षण घेतले, तरीही कायद्याची पदवी घेण्यासाठी ते मुंबईत पोहोचले. त्यांच्या नेतृत्वाखाली, बजाज ऑटोची उलाढाल 7.2 कोटींवरून 12 हजार कोटींपर्यंत पोहोचली आणि ते देशातील आघाडीचे स्कूटर आणि दुचाकी विक्रेता बनले.

राहुल बजाज यांचे नेहरू कुटुंबाशी तीन पिढ्यांपासून घनिष्ट कौटुंबिक मैत्रीपूर्ण संबंध होते. राहुल बजाज यांचे वडील कमलनयन आणि इंदिरा गांधी यांनी काही काळ एकाच शाळेत शिक्षण घेतले होते. हा त्यांचा कार्यकाळ होता, जेव्हा बजाज ही टॉप स्कूटर निर्माता कंपनी बनली. 2005 मध्ये राहुल यांनी आपल्या मुलाच्या हातात कंपनीची जबाबदारी देऊन मुलाला कंपनीचे एमडी बनवले.

Rahul Bajaj Passes Away: Death of industrialist Rahul Bajaj, mourning over business world, memories of Gadkari

महत्त्वाच्या बातम्या

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात