शंभर टक्के लसीकरण केल्यास पंजाबमध्ये गावांना दहा लाखांचा निधी – अमरिंदर सिंग

विशेष प्रतिनिधी

चंडीगड – शंभर टक्के लसीकरण करणाऱ्या गावांना दहा लाख रुपयांचा विशेष विकास निधी देण्याची घोषणा पंजाबचे मुख्यमंत्री कॅप्टन अमरिंदर सिंग यांनी केली. Punjab govt. declares award for vaccination

ते म्हणाले की, सरपंच आणि पंच मंडळींनी गावाच्या कोरोनाविरोधी लढ्यात पुढाकार घ्यावा आणि राज्य शासनाच्या कोरोना मुक्त पींड अभियानला चालना द्यावी. सौम्य लक्षणे असले तरी लोकांना चाचणीसाठी पुढे यायला लावावे.पंजाबमधील नव्या रुग्णांची रोजची संख्या नऊ हजारांवरून सात हजाराच्या खाली आली आहे. पंजाबने लसीकरण वेगाने व्हावे यासाठी अनेक उपाययोजना आखल्या आहेत.
तातडीच्या कोविड उपचारांसाठी पंचायत निधी वापरण्याची परवानगी दिली असून दररोज किमान पाच हजार ते कमाल ५० हजार रुपये खर्च करता येणार आहेत.

तसेच विशेष वैद्यकीय शिबिरे आयोजित करण्याची पंचायतींना परवानगी दण्यात आली आहे. गावात बाधित व्यक्तींनी प्रवेश करू नये म्हणून गावकऱ्यांना गटागटाने गस्त घालण्याचे आवाहन केले असून सध्याच्या दोन हजार ४६ आरोग्य केंद्रांशिवाय आणखी ८०० केंद्रे लवकरच सुरु होणार आहेत.

Punjab govt. declares award for vaccination

महत्त्वाच्या बातम्या