प्रियांका गांधी लखीमपूरमध्ये, तरीही अखिलेश यादव यांची समाजवादी विजय यात्रा ट्विटर ट्रेंडिंगमध्ये


विशेष प्रतिनिधी

लखनऊ : काँग्रेसच्या सरचिटणीस प्रियांका गांधी आज लखिमपूरमध्ये पोहोचल्या आहेत. तेथे झालेल्या हिंसाचारात ठार झालेल्या शेतकऱ्यांना श्रद्धांजली वाहण्याच्या कार्यक्रमात त्या सहभागी झाल्या आहेत. Priyanka Gandhi in Lakhimpur, yet Akhilesh Yadav’s Samajwadi Vijay Yatra in Twitter trending

प्रियंका गांधी यांना स्टेजवर येऊ दिले जाणार नाही, असे संयुक्त किसान मोर्चाने स्पष्ट केल्यानंतर देखील प्रियांका गांधी सर्वसामान्य शेतकऱ्यांचा सारख्या तेथे पोहोचल्या आणि त्यांनी श्रद्धांजली सभेत सहभाग घेतला. त्या स्टेजवर बसल्या नाहीत तर शेतकऱ्यांमध्ये पहिल्या रांगांमध्ये खाली बसल्या. त्याचे फोटो एएनआय सारख्या वृत्तसंस्थेने देखील ट्विटरवर शेअर केलेत.

एकीकडे प्रियांका गांधी यांनी लखीमपूर हिंसाचाराचा मुद्दा राजकीय दृष्ट्या तापवत ठेवलेला असताना दुसरीकडे समाजवादी पक्षाचे नेते आणि माजी मुख्यमंत्री अखिलेश यादव हे समाजवादी विजय यात्रेवर निघाले आहेत. त्यांनी आज कानपूरमध्ये मोठ्या जाहीर सभेला संबोधित केले. सध्या समाजवादी विजय यात्रा ट्विटरवर टॉप टेन मध्ये ट्रेंडिंगला दिसते आहे. प्रियांका गांधी यांनी राजकीय दृष्ट्या पुढे येण्याचा प्रयत्न क करीत असल्या अखिलेश यादव हे ट्विटर सारख्या सोशल मीडियात त्यांच्यापेक्षा पुढे असल्याने उत्तर प्रदेश मधला राजकीय कल या दोन नेत्यांच्या स्पर्धेत सध्या नेमका कोणाकडे आहे हे सर्वसाधारणपणे दिसून येत आहे.

अखिलेश यादव यांनी लखीमपूरला भेट दिली असली तरी त्यांनी आपले सगळे लक्ष संपूर्ण उत्तर प्रदेश यावर केंद्रित केले आहे, तर प्रियांका गांधी यांनी आपले लक्ष अद्यापही लखीमपूर हिंसाचाराला भोवतीच केंद्रीत ठेवले आहे परंतु त्याचे प्रतिबिंब मात्र सोशल मीडियावर अपेक्षेप्रमाणे पडताना दिसत नाही. कारण ट्विटरवर टॉप टेन मध्ये प्रियांका गांधी यांनी उचलून धरलेला लखीमपूर हिंसाचाराचा मुद्दा दिसत नाही.

Priyanka Gandhi in Lakhimpur, yet Akhilesh Yadav’s Samajwadi Vijay Yatra in Twitter trending

महत्त्वाच्या बातम्या

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात