महाराष्ट्र बंद वर राजू शेट्टी यांची प्रतिक्रिया “मी सध्या कोणावरही खुश नाही आहे”

Raju Shetty

विशेष प्रतिनिधी

बुलढाणा : शेतकरी नुकसान, नैसर्गिक आपत्ती, लखिमपुर खेरी हिंसाचार अशा अनेक मुद्द्यांवर स्वाभिमानी शेतकरी संघटनेने आपली प्रतिक्रिया व्यक्त केली आहे. स्वाभिमानी शेतकरी संघटना नेते राजू शेट्टी यांनी ते कुणावरच खुश नसल्याचे म्हंटले आहे.

Leader Raju Shetty’s reaction on Maharashtra Band

He is Not happy with anything

राजू शेट्टी म्हणाले की, “निसर्गाने शेतकऱ्यांचे लचके तोडले असून केंद्र सरकारकडून शेतकऱ्यांचे वाटोळे होत आहे व राज्य सरकारचे शेतकऱ्यांकडे दुर्लक्ष झाले आहे. त्यामुळे मी कुणावरच खुश नाही.” शेतकऱ्यांचा आक्रोश संपेपर्यंत आम्ही समाधानी होणार नाही असे वक्तव्य स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते राजू शेट्टी यांनी केले. बुलढाणात दिलेल्या भेटीदरम्यान त्यांनी हे वक्तव्य केले आहे.


राजू शेट्टी यांचे किरीट सोमय्याना आव्हान, भाजप नेते प्रवीण दरेकर अध्यक्ष असलेल्या मुबंई जिल्हा मध्यवर्ती बँके मधील भ्रष्टाचार बाहेर काढावा


लखिमपुर खेरीमध्ये शेतकऱ्यांचा जो नरसंहार झाला  त्याचा निषेध म्हणून महाराष्ट्र बंद पुकारला गेला. पण तो कशासाठी केला गेला आहे पटवून सांगण्यात हा महविकास आघाडीचे नेते कमी पडले, असे राजू शेट्टी म्हणाले. शेतकऱ्यांचा आक्रोश राज्य आणि केंद्र सरकार पर्यंत गेला पाहिजे याकरिता आम्ही या बंदला पाठिंबा दिल्या असल्याचे ते म्हणाले.

संपूर्ण देशामध्ये जे वीज टंचाईचे संकट आहे त्यासाठी सर्वस्वी केंद्र सरकार जबाबदार असल्याचे राजू शेट्टी यांनी म्हटले आहे. या समस्येवर उपाययोजना करण्यासाठी केंद्र सरकार कुठेतरी कमी पडले असे त्यांचे म्हणणे म्हणणे होते. ते पुढे म्हणाले की, “राज्य सरकारने शेतकऱ्यांचे नुकसान भरून द्यावे तसेच सरकारनी विमा कंपन्यांना २५ टक्के अधिक रक्कम देण्याचे आदेश दिले पाहिजेत.”

Leader Raju Shetty’s reaction on Maharashtra Band

He is Not happy with anything

 

महत्त्वाच्या बातम्या

 

Array

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात