Modi in Denmark : डेन्मार्कच्या पंतप्रधानांच्या घरात झळकतेय ओरिसातील पारंपारिक रामपंचायतन पट्टाचित्र!!


वृत्तसंस्था

कोपेनहेगन : पंतप्रधान नरेंद्र मोदी सध्या युरोपच्या दौऱ्यावर आहेत. जर्मनी आणि डेन्मार्कमध्ये मराठी मंडळींनी पारंपारिक वेशात त्यांचे केलेले स्वागत सध्या सोशल मीडियावर चमकत आहे. त्यावर अनेक युजर्स जोरदार कमेंट करतात आहे. मोदींचा भारतीयांशी झालेला संवाद जगभरात उत्सुकतेचा विषय बनला आहे. Prime Minister Narendra Modi is currently on a tour of Europe

या पार्श्‍वभूमीवर मोदी डिप्लोमॅटिक असाइनमेंट मध्ये व्यग्र आहेत. डेन्मार्कच्या पंतप्रधान मेटे फ्रेड्रिक्सन यांनी त्यांचे सरकारी इतमामात स्वागत केले आहे. पण द्विपक्षीय चर्चेच्या वेळी त्यांनी डेन्मार्कच्या पंतप्रधानांनी आपले सरकारी निवासस्थान स्वतः फिरून दाखवले हे आहे. यावेळी डेन्मार्कच्या निवासस्थानाच्या मुख्य हॉलमध्ये झळकत असलेल्या एका चित्राकडे डेन्मार्कच्या पंतप्रधान यांनी पंतप्रधान मोदींचे आवर्जून लक्ष वेधले. हे ते चित्र आहे, जे पंतप्रधान मोदींनी डेन्मार्कच्या पंतप्रधानांना त्यांच्या भारत दौर्‍यात त्यांना विशेष भेट म्हणून दिले होते.

9 ते 11 ऑक्टोबर 2021 या तीन दिवसात डेन्मार्कच्या पंतप्रधान मेटे फ्रेड्रिक्सन या भारतात आल्या होत्या. त्यावेळी पंतप्रधान मोदींनी त्यांना ओरिसाचे वैशिष्ट्य असलेले पट्टाचित्र विशेष फ्रेम करून भेट दिले होते. राम, लक्ष्मण, जानकी, भरत शत्रुघ्न आणि हनुमान अशा रामपंचायतनाचे ते पारंपारिक पट्टाचित्र आहे. हे पट्टाचित्र आज डेन्मार्कच्या पंतप्रधानांनी आपल्या सरकारी निवासस्थानाच्या मुख्य हॉल मध्ये विराजमान केले आहे. याच चित्राकडे मेटे फ्रेड्रिक्सन यांनी पंतप्रधान मोदींचे आवर्जून लक्ष वेधले. हे चित्र पाहून पंतप्रधान मोदींनी देखील आनंद व्यक्त केला आहे. ओरिसाची पारंपारिक चित्रकला अशा पद्धतीने युरोपमधल्या डेन्मार्कच्या पंतप्रधानांच्या निवासस्थानी झळकताना पाहू पंतप्रधान मोदींच्या चेहर्‍यावर समाधान पसरले होते.

Prime Minister Narendra Modi is currently on a tour of Europe

महत्वाच्या बातम्या 

Array

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात