पंतप्रधान नरेंद्र मोदी इटली दौऱ्यावर!


विशेष प्रतिनिधी

इटली : भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी इटलीचे पंतप्रधान मारियो द्राघी यांच्या निमंत्रणावरून 16 व्या G20 शिखर परिषदेला उपस्थित राहण्यासाठी तीन दिवसांच्या इटली दौऱ्यावर आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी शुक्रवारी इटलीत दाखल झाले आहेत. इटलीचे पंतप्रधान मारियो द्राघी यांनी रोममधील पलाझो चिगी येथे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे स्वागत केले आहे. तसेच इटालियन सरकारचे वरिष्ठ अधिकारी आणि इटलीतील भारताचे राजदूत यांनी देखील मोदींजींचे जोरदार स्वागत केले आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी शनिवारी व्हॅटिकन सिटीमध्ये पोप फ्रान्सिस यांची भेट घेणार आहेत.

Prime Minister Narendra Modi has gone to Italy to attend G20 summit!

इटली दौऱ्यावर जाण्याआधी पंतप्रधान मोदीजी म्हणाले होते, रोममध्ये मी 16 जी-20 देशांच्या गटाच्या शिखर परिषदेत भाग घेईन. या परिषदेत जागतिक अर्थव्यवस्था आणि कोरोना सारखे साथीचे रोग, शाश्वत विकास आणि हवामानाची संबंधित जल आणि वायू प्रदूषण या समस्यांवर चर्चा करण्यात येईल.


DIGITAL INDIA : मोदी सरकारच्या e-Shram पोर्टलवर 4 कोटी कामगारांची नोंदणी; महिलांकडून प्रचंड प्रतिसाद


ब्रिटनचे पंतप्रधान बोरिस जॉन्सन यांच्या निमंत्रणावरून मोदीजी 1 आणि 2 नोव्हेंबर रोजी ग्लासगो, यूके येथे जातील. कोविड-19 महामारी नंतर ही पहिलीच शिखर परिषदेत आहे. पंतप्रधान मोदी यांनी सांगितले, G-20 बैठकीमुळे सध्याची जागतिक परिस्थिती आणि महामारीनंतर सर्वसमावेशक आणि शाश्वत पद्धतीने अर्थव्यवस्था मजबूत करण्यासाठी उपाययोजनांवर चर्चा करण्याची संधी मिळेल.

Prime Minister Narendra Modi has gone to Italy to attend G20 summit!

 

महत्त्वाच्या बातम्या

Array

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात