अल्पसंख्यांकांचे जीवनमान उंचावण्यसाठी पंतप्रधान मोदींचा पंधरा कलमी कार्यक्रम


विशेष प्रतिनिधी

नवी दिल्ली : देशातील अल्पसंख्यांकांच्या जीवनमान उंचवावे यासाठी अल्पसंख्यांक मंत्रालयाकडून अल्पसंख्यांकांच्या कल्याणासाठी तयार केलेल्या पंतप्रधानांच्या पंधरा कलमी कार्यक्रमाची अंमलबजावणी करण्यात येणार आहे.Prime Minister Modi’s 15 point program to uplift the living standards of minorities

केंद्र सरकारची विविध मंत्रालये ख्रिश्चन, शीख, जैन आणि मुस्लीम, बौद्ध आणि पारशी या देशातील नोंदणीकृत अल्पसंख्यांकांसाठी हा पंधरा कलमी कार्यक्रम राबवणार आहेत. या योजनांद्वारे अल्पसंख्यांकांना शिक्षण, आर्थिक विकास यामध्ये त्यांचा योग्य वाटा निश्चित करणे. तसेच जातीय असमानता आणि हिंसाचार रोखणे आणि नियंत्रण करणं हे मोदी सरकारचं उद्दीष्ट आहे.



मौलाना आझाद राष्ट्रीय फेलोशिप योजना, बेगम हजरत महल राष्ट्रीय स्कॉलरशीप, नया सवेरा – मोफत शिक्षण योजना या शैक्षणिक विकासासाठी योजना आहेत. आर्थिक विकास आणि कौशल्य विकास योजनांमध्ये कमवा आणि शिका योजना, गरीब नवाज रोजगार प्रशिक्षण कार्यक्रम, प्रधानमंत्री कौशल विकास योजना, राष्ट्रीय अल्पसंख्यांक विकास निधी महामंडळ कर्ज योजना,

बँकांकडून प्राधान्य क्षेत्रातील कर्ज देणे (वित्तीय सेवा विभाग), राष्ट्रीय शहरी उपजीविका अभियान (गृहनिर्माण आणि नागरी व्यवहार), राष्ट्रीय ग्रामीण उपजीविका अभियान (ग्रामीण विकास मंत्रालय), दीनदयाल उपाध्याय ग्रामीण कौशल योजना (ग्रामीण विकास मंत्रालय), प्रधानमंत्री आवास योजना (ग्रामीण) यांचा समावेश आहे.

Prime Minister Modi’s 15 point program to uplift the living standards of minorities

महत्त्वाच्या बातम्या

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात