President of Geeta Press Radheshyam Khemka passed away

गीता प्रेसचे अध्यक्ष राधेश्याम खेमका यांचे निधन, ४० वर्षांपासून विविध धार्मिक पत्रिकांचे केले संपादन

Radheshyam Khemka : यूपीच्या गोरखपूरमधील गीता प्रेसचे अध्यक्ष आणि सनातन धर्माचे प्रसिद्ध मासिक ‘कल्याण’चे संपादक राधेश्याम खेमका यांचे निधन झाले आहे. ते 87 वर्षांचे होते. शनिवारी दुपारी राधेश्याम खेमका यांनी वाराणसीतील केदार घाट येथील निवासस्थानी अखेरचा श्वास घेतला. गेल्या काही दिवसांपासून त्यांची प्रकृती ठीक नव्हती. President of Geeta Press Radheshyam Khemka passed away


विशेष प्रतिनिधी

नवी दिल्ली : यूपीच्या गोरखपूरमधील गीता प्रेसचे अध्यक्ष आणि सनातन धर्माचे प्रसिद्ध मासिक ‘कल्याण’चे संपादक राधेश्याम खेमका यांचे निधन झाले आहे. ते 87 वर्षांचे होते. शनिवारी दुपारी राधेश्याम खेमका यांनी वाराणसीतील केदार घाट येथील निवासस्थानी अखेरचा श्वास घेतला. गेल्या काही दिवसांपासून त्यांची प्रकृती ठीक नव्हती.

हरिश्चंद्र घाट येथे राधेश्याम खेमका यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले. त्यांचे सुपुत्र राजाराम खेमका यांनी मुखाग्नि दिला. गेली 40 वर्षे सनातन धर्माचे प्रसिद्ध मासिक ‘कल्याण’चे संपादक राधेश्याम खेमका यांची प्रकृती मागच्या 15 दिवसांपासून ठीक नव्हती. प्रकृती बिघडल्याने त्यांना वाराणसीच्या रवींद्रपुरी भागातील खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले होते.

दोन दिवसांपूर्वी राधेश्याम खेमका यांना रुग्णालयातून केदारघाट येथील त्यांच्या निवासस्थानी आणण्यात आले. शनिवारी दुपारी 12.30 वाजता त्यांनी अखेरचा श्वास घेतला. अनेक संतांशी जवळीक असेलेल राधेश्याम खेमका मागच्या 40 वर्षांपासून सनातन धर्मचे मासिक ‘कल्याण’च्या संपादनाची जबाबदारी सांभाळत होते.

President of Geeta Press Radheshyam Khemka passed away

महत्त्वाच्या बातम्या

    Leave Your Comment

    Your email address will not be published.*