बिहारमध्ये लालूपुत्रांमध्ये आता उफाळले ‘पोस्टर वॉर’, लालूंना पुन्हा करावी लागणार मध्यस्थी


विशेष प्रतिनिधी

पाटणा – राष्ट्रीय जनता दलाचे सर्वेसर्वा लालू प्रसाद यादव यांच्या दोन्ही पुत्रांमध्ये आलबेल नसल्याचे पुन्हा स्पष्ट झाले आहे. तेजप्रताप यादव व तेजस्वी यादव या दोन भावांमध्ये ‘पोस्टर युद्ध’ सुरू झाले आहे. दोन्ही भावांमधील वादविवादाचे पडसाद उमटत असतात. तेजप्रताप यांच्या विधानांवरून अनेकदा पक्ष अडचणीत आल्याच्याही घटना घडत असतात. ते काहीही बोलतात व काहीही करतात. ते स्वतःला सर्वांपेक्षा श्रेष्ठ समजतात. या वादांमध्येद काही वेळा लालू प्रसाद यादव यांना मध्यस्ती करावी लागली आहे.Poster war between lalus two boys

‘आरजेडी’च्या कार्यालयात झालेल्या कार्यक्रमात तेजप्रताप प्रमुख पाहुणे होते. पक्ष कार्यालयातील फलकावर केवळ त्यांचेच छायाचित्र होते. तेजस्वी यांची छबी गायब होती. नंतर हे पोस्टर हटवून नवा फलक उभारला. त्यावर लालू प्रसाद, राबडी देवी यांच्यासह फक्त तेजस्वी यादव यांची छायाचित्र असून तेजप्रताप यांना वगळले आहे.



 

या घटनेतून लालू पुत्रांमधील वाद आता चव्हाट्यावर आला आहे. दोघांनी त्यांच्या फलकांवरून एकमेकांचे छायाचित्र प्रसिद्ध करण्यापासून हात आखडता घेतला आहे. तेजप्रताप यादव यांचे छायाचित्र असलेला फलक पक्ष कार्यालयातून हटविल्याने अपमान झालेल्या तेजप्रताप यांनी ‘आरजेडी’चे बिहारचे प्रदेशाध्यक्ष जगदानंदसिंह यांना ‘हिटलर’ असे संबोधले आहे. ‘‘जगदानंद यांच्या सांगण्यानुसार माझे फलक हटविण्यात आले आहे. ते हिटलर आहेत.

Poster war between lalus two boys

महत्त्वाच्या बातम्या

Array

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात