विशेष प्रतिनिधी
डेहराडून : कुंभमेळ्यादरम्यान घडलेल्या कोरोना चाचण्यांच्या बोगस अहवाल प्रकरणावरून आता राजकारण चांगलचे तापू लागले आहे. कुंभमेळ्याच्या कालावधीत ३० लाख ६० हजार ८३१ चाचण्या करण्यात आल्या. त्यातील केवळ १७ हजार ३१७ अहवाल पॉझिटिव्ह आले.Politics erupts in Uttarakhand on corona reports
संसर्गाचे हे प्रमाण केवळ २.८८ टक्के होते. उत्तराखंडमध्ये त्या कालावधीत हेच प्रमाण १४ टक्के होते.यावरून आता आजी-माजी मुख्यमंत्री एकमेकांसमोर उभे ठाकले आहेत. त्यामुळे भाजपमधल गटबाजी उघड झाली आहे.
हे प्रकरण आपल्या आधीच्या काळाशी संबंधित असल्याचा धक्कादायक दावा विद्यमान मुख्यमंत्री तिरथसिंह रावत यांनी केला, तर आधीचे मुख्यमंत्री त्रिवेंद्रसिंह रावत यांनी याप्रकरणी न्यायालयीन चौकशीची मागणी केली.
तिरथसिंह म्हणाले की, कुंभमेळ्यादरम्यान कोरोना चाचणी करण्यासाठी खासगी संस्थांना पाचारण करण्याचा निर्णय मी मुख्यमंत्रिपदाची सूत्रे हाती घेण्यापूर्वी झाला. चौकशीचा आदेश यापूर्वीच देण्यात आला आहे आणि दोषींविरुद्ध कठोर कारवाई केली जाईल.
सरकारने मॅक्स कॉर्पोरेट सर्व्हिस ही कंपनी व हिसारमधील नालवा व दिल्लीतील डॉ. लालचंदानी या दोन खासगी प्रयोगशाळांविरुद्ध गुन्हा दाखल केला. कोरोना चाचण्यांचे बोगस अहवाल सादर केल्याचा आरोप ठेवण्यात आला.
महत्त्वाच्या बातम्या
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App