भारत जोडो यात्रेत मध्य प्रदेशात चेंगराचेंगरी; तर राजस्थानात राजकीय रेटारेटी; काँग्रेसचा वाढता टीआरपी


प्रतिनिधी

इंदूर : राहुल गांधींच्या भारत जोडो यात्रेला टीआरपी मिळतो आहे, तो कुठल्यातरी वादामुळेच. राहुल गांधींनी निर्माण केलेला सावरकरांचा तथाकथित माफीनामा असो की मध्य प्रदेशात झालेली चेंगराचेंगरी असो, त्याच्याच बातम्या सगळीकडे झळकत आहेत. त्यापलिकडे देखील भारत जोडो यात्रेच्या निमित्ताने पुन्हा एकदा राजस्थानला अशोक गेहलोत विरुद्ध सचिन पायलट ही राजकीय रेटारेटी पुन्हा उफाळून आली आहे. Political controversies gives more TRP to Congress bharat Jodo yatra than rahul Gandhi speeches

मध्य प्रदेशात काँग्रेसच्या भारत जोडो यात्रेचा आज मध्य प्रदेशातील पदयात्रेचा चौथा दिवस आहे. काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांच्या नेतृत्वाखाली ही यात्रा आज, शनिवारी ओंकारेश्वर ते इंदूरकडे निघाली आहे. यानंतर राहुल गांधी आपल्या टीमसह राजस्थानमध्ये दाखल होणार असून, त्या ठिकाणी अशोक गेहलोत आणि सचिन पायलट यांची भेट घेणार आहेत. पण इंदूर मार्गावरून
या यात्रेदरम्यान चहापानाच्या वेळी धक्काबुक्की झाली आणि चेंगराचेंगरीमध्ये पक्षाचे ज्येष्ठ नेते आणि मध्य प्रदेशचे माजी मुख्यमंत्री दिग्विजय सिंह खाली जमिनीवर कोसळले. तेथे उपस्थित असलेल्या समर्थकांनी त्यांना आधार देत सावरले.



राहुल गांधी राजस्थान अशोक गहलोत आणि सचिन पायलट यांना बरोबर घेऊन भारत जोडो यात्रा करणार असले तरी त्याच्या आधीच या दोन्ही नेत्यांमधला राजकीय वाद पुन्हा एकदा उफाळून आला आहे. त्याच्या बातम्या सर्वत्र झळकल्या आहेत. राहुल गांधी भारत जोडो यात्रेतल्या प्रत्येक भाषणात केंद्र सरकारवर वेगवेगळे मुद्द्यांवर टीका करतात. त्याच्याही थोड्या बातम्या माध्यमांमध्ये झळकतात. पण काँग्रेस मधल्या वादाच्या बातम्या मात्र भारत जोडो यात्रेला जास्त टीआरपी मिळवून देत असल्याचे दिसत आहे.

Political controversies gives more TRP to Congress bharat Jodo yatra than rahul Gandhi speeches

महत्वाच्या बातम्या

Array

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात