भारत जोडो यात्रा; सावरकरांवर टीका; राहुलजींच्या टीआरपीत एकदम सुधारणा!!


विशेष प्रतिनिधी

दिल्ली  : गेले 60 – 70 दिवस राहुल गांधी भारत जोडो यात्रेत आहेत. भारत जोडो यात्रा आता निम्म्यावर आली आहे आणि गेले 6 – 7 दिवस ते महाराष्ट्रात आहेत. पण या दरम्यान प्रसार माध्यमांमध्ये एवढे वेगवेगळे विषय आले की त्यामुळे राहुल गांधींच्या भारत जोडो यात्रेला त्यांना अपेक्षित असलेला टीआरपीच मिळाला नाही… मग त्यांनी आपले नेहमीचे शस्त्र बाहेर काढले. राहुलजींनी सावरकरांवर महाराष्ट्रात येऊन टीका करायला सुरुवात केली आणि त्यांच्या टीआरपी मध्ये झपाट्याने सुधारणा झाली. Rahul Gandhi targets savarkar to increase TRP of Congress bharat Jodo yatra

आजही अकोल्याच्या पत्रकार परिषदेत राहुलजींनी सावरकरांनी ब्रिटिशांना लिहिलेले जुनेच पत्र पुन्हा फडकवून दाखवले. हे तेच पत्र आहे, ज्यावर वारंवार खुलासे देखील झाले आहेत. इतिहासकारांनी, चरित्रकारांनी सावरकरांच्या तथाकथित माफीनाम्यावर ऐतिहासिक पुराव्यांसह प्रकाशझोतही टाकला आहे. पण या संपूर्ण प्रकाशझोताकडे आणि ऐतिहासिक तथ्याकडे दुर्लक्ष करून राहुलजींनी पुन्हा तोच मुद्दा, माफीनाम्याचा उकरून काढला आहे… पण या सर्व गदारोळात राहुलजींचा मूळ हेतू मात्र साध्य झाला आहे…, तो म्हणजे राहुलजींच्या भारत जोडो यात्रेच्या टीआरपीत कमालीची सुधारणा झाली आहे!!



 आव्हाड प्रकरणामुळे झाकोळले राहुल

राहुलजी महाराष्ट्रात आल्यानंतर सुरुवातीला थोडीफार प्रसिद्धी जरूर मिळाली, पण दोनच दिवसात संजय राऊत आणि जितेंद्र आव्हाड यांचे विषय सुरू झाले. त्यामुळे राहुलजींच्या टीआरपीट घसरण झाली. भारत जोडो यात्रा टीआरपीमध्ये फारच खाली फेकली गेली. मराठी माध्यमांनी तर जितेंद्र आव्हाड यांनी केलेल्या विनयभंग प्रकरणाला इतके रंगविले की काँग्रेस सारख्या राष्ट्रीय पक्षाचे राष्ट्रीय नेते राहुल गांधी महाराष्ट्रात आहेत याचा मराठी माध्यमांना विसरच पडला होता. राहुल गांधींची यात्रा काही दिवसातच महाराष्ट्राबाहेर गेली तर आपल्या प्रसिद्धीचे काय होणार याची चिंता महाराष्ट्रातल्या काँग्रेसजनांना लागली होती. शिवाय राहुल गांधींच्या भारत जोडो यात्रेच्या निमित्ताने महाराष्ट्रातले नेते आपल्या मुलांसाठीच राजकीय लॉन्चिंग पॅड म्हणून उपयोग करत आहेत, अशी टीकाही माध्यमांनी केलीच होती. त्यामुळे भारत जोडो यात्रेची कुठलीच पॉझिटिव्ह बातमी माध्यमांमध्ये व्हायरल होत नव्हती.

 भारत जोडो यात्रा “उजळली”

या सगळ्याची चिंता काँग्रेस जणांना भेडसावत असताना राहुल गांधींनी त्यावर नेहमीच “जबरदस्त” राजकीय तोडगा काढला, तो म्हणजे त्यांनी पुन्हा एकदा सावरकरांवर टीका केली. तशीही राहुल गांधींची भारत जोडो यात्रा केरळ आणि कर्नाटकात सावरकरांच्या पोस्टरमुळे गाजलीच होती, ती महाराष्ट्रात आल्यानंतर जितेंद्र आव्हाड, संजय राऊत प्रकरणांमुळे झाकोळली गेली होती. ती पुन्हा एकदा सावरकरांच्या टीकेमुळे उजळली आहे.

 मुद्दा नवा नाही, पण…

राहुल गांधींनी नवीन कोणताच मुद्दा उपस्थित केलेला नाही. पण सावरकरांवर त्यांनी केलेल्या टीकेमुळे भाजपवाले त्यांच्यावर भडकले. मनसेवाले खवळले. आता ते काळे झेंडे दाखवणार आहेत. या निमित्ताने का होईना, राहुल गांधींच्या घसरलेल्या टीआरपीने टिपणी थोडी उसळी घेतली आहे, हे मात्र निश्चित!! शिवाय त्याला राजकीय मुहूर्त देखील असा लाभला आहे की जो क्वचितच लाभतो, तो बाळासाहेबांच्या स्मृतिदिनाचा!!

Rahul Gandhi targets savarkar to increase TRP of Congress bharat Jodo yatra

महत्वाच्या बातम्या

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात