दहशतवाद – इस्लाम यांचे संबंध तोडण्यासाठी सौदी आणि यूएईला भारताची साथ; राम माधवांचे प्रतिपादन


प्रतिनिधी

मुंबई : पाकिस्तान इस्लामच्या नावावर जगभरात दहशतवाद पसरवत आहेत. त्यामुळे इस्लाम आणि दहशतवाद या एका नाण्याच्या दोन बाजू असल्याचे चित्र जगभरात पोहोचत आहे. ते पुसण्यासाठी सौदी अरेबिया आणि यूएईने पुढाकार घेतला असून, इस्लाम आणि दहशतवाद यांचा संबंध तोडण्यासाठी या देशांना भारत सर्वतोपरी मदत करीत असल्याचे भाजपा नेते राम माधव यांनी सांगितले. India supports Saudi and UAE to break terrorism-Islam links

पांचजन्यतर्फे आयोजित ‘२६/११ मुंबई संकल्प’ परिषदेत ते बोलत होते. शुक्रवारी, २५ नोव्हेंबर रोजी फोर्ट येथील हॉटेल ताजमहाल पॅलेसमध्ये ही परिषद आयोजित करण्यात आली आहे. पहिल्या सत्राला संबोधित करताना माधव म्हणाले, इस्लामोफोबिया ही संकल्पना केवळ पाकिस्तानमुळे अस्तित्त्वात आली. इस्लामच्या नावावर ते दहशतवाद पसरवत आहेत. भारतात १८ कोटी मुस्लीम शांततेत राहतात. इकडे कोणामध्ये इस्लामोफोबिया दिसत नाही. त्यामुळे पाकिस्तानच्या नापाक कृत्यांमुळे जगभरात इस्लामचा होणारा अपप्रचार थांबवण्यासाठी यूएई, सौदी यांसारखे देश पुढे आले आहेत. त्यांना भारत सर्वतोपरी मदत करीत आहे.


PFI ची मायावी रुपे : एकट्या PFI बंदी नव्हे, तर रिहैब फाउंडेशनसह “या” 9 उपसंस्थांवर बंदी!!


दहशतवादाचे अनेक छुपे प्रकार

  • राम माधव म्हणाले, दहशतवाद म्हणजे केवळ बंदूक घेऊन गोळ्या झाडणे नव्हे. त्याला पैसा पुरवणे, दहशतवादी कृत्यांना सहकार्य करणे यांसह अनेक छुपे प्रकार दहशतवादाच्या व्याख्येत मोडतात.
  • त्याचप्रकारे दहशतवादी कृत्यांना आळा घालणे, याचा अर्थ केवळ दहशतवाद्यांना मारणे नव्हे. तर दहशतवादाला मूळासकट संपवण्याची गरज आहे.
  • त्यासाठी नरेंद्र मोदी सरकारने 370 कलम हटवून जम्मू-काश्मीरमध्ये मोठे बदल घडवून आणले आहेत. त्यामुळेच आता काश्मीरमध्ये दहशतवाद्यांचे जीवनमान केवळ दोन महिन्यांचे उरले आहे.
  • त्यासाठी सरकारने इंटिलीजन्स व्यवस्था मजबूत केली. शिवाय दहशतवाद्यांना मदत करणाऱ्यांचे मनपरिवर्तन करण्यातही आम्हाला यश आलेले आहे.
  • काश्मीरमधील नागरिकांमध्ये देशभावना जागृत केल्यामुळे तेथे आता अभूतपूर्व बदल घडत आहेत.

India supports Saudi and UAE to break terrorism-Islam links

महत्वाच्या बातम्या

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*    मंत्रालयात प्रवेशद्वाराजवळ महात्मा फुले, सावित्रीबाई फुले यांच्या तैलचित्राचे अनावरण भारतात आता एक देश एक चार्जर जलयुक्त शिवार योजना पुन्हा चालू होणार; शिंदे – फडणवीस सरकारचा महत्त्वाचा निर्णय