P.M.मोदींचे सानिया मिर्झाला पत्र, इतर खेळाडूंना मिळाले इन्स्पिरेशन!


प्रतिनिधी

नवी दिल्ली : भारताची टेनिस स्टार सानिया मिर्झाने शनिवारी ट्विटरवर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना इन्स्पायरिंग फेथफुल पत्र पाठवल्याबद्दल त्यांचे आभार मानले. 36 वर्षीय या टेनिसपटूने शानदार कारकिर्दीनंतर गेल्या महिन्यात खेळातून निवृत्ती घेतली. PM Modi’s letter to Sania Mirza, other athletes got inspiration!

“अशा प्रकारच्या आणि इन्स्पायरिंग फेथफुल वर्डसाठी मी माननीय पंतप्रधान @narendramodi जी तुमचे आभार मानू इच्छिते. माझ्या क्षमतेनुसार आपल्या देशाचे प्रतिनिधित्व करण्याचा मला नेहमीच अभिमान वाटतो आणि भारताचा अभिमान वाढवण्यासाठी मी जे काही करू शकते ते करत राहीन. तुमच्या पाठिंब्याबद्दल धन्यवाद,” सानियाने मिर्झा. असे ट्विट केले.

नरेंद्र मोदींनी सानिया मिर्झाला लिहिलेल्या पत्रात ते असे म्हणाले की,

“टेनिसप्रेमींना हे समजणे कठीण जाईल. की आता तुम्ही म्याचेस खेळणार नाही. परंतु, भारतातील सर्वोत्तम टेनिसपटूंपैकी एक म्हणून आपल्या कारकिर्दीद्वारे, आपण भारतीय खेळांवर छाप सोडली आहे, खेळाडूंच्या आगामी पिढीला प्रेरणा दिली आहे. मी म्हणू शकतो की तुम्ही भारताचा अभिमान आहात, ज्याचा. यशाने प्रत्येक भारतीयाचे हृदय अत्यंत आनंदाने भरले आहे.

जेव्हा तुम्ही खेळायला सुरुवात केली तेव्हा भारताची टेनिसची लँडस्केप खूप वेगळी होती. तुम्ही स्पष्ट केले की महिला टेनिस खेळू शकतात आणि त्यात उत्कृष्ट कामगिरी करू शकतात. पण, त्यापलीकडे, तुमच्या यशाने इतर अनेक महिलांना बळ दिले. ज्यांना क्रीडा क्षेत्रात करिअर करायचे होते. परंतु काही कारणास्तव ते करण्यास कचरत होत्या. तुमच्या यशाने ते प्रेरित झाले आणि उंच भरारी घेण्यास तयार झाल्या . तुम्ही हे निःस्वार्थ ध्येय पूर्ण केले आहे.

तुम्ही भारतातील लोकांना आनंद देण्यासाठी खूप काही दिले. ज्युनियर खेळाडू म्हणून विम्बल्डनमधील तुमच्या सुरुवातीच्या यशाने हे दाखवून दिले की तुम्ही आता उंच भरारी घेतली आहे. त्याचप्रमाणे, त्यानंतरच्या ग्रँड स्लॅम स्पर्धांमध्ये तुमचा विजय, मग ते महिला दुहेरी टूर्नामेंट असोत किंवा मिश्र दुहेरीत टूर्नामेंट, यातून तुम्ही कौशल्य आणि खेळाबद्दलची आवड दाखवून दिली.

नशिबाच्या वळणांमुळे, तुम्हाला दुखापतींचा सामना करावा लागला, परंतु या अडथळ्यांमुळे तुमचा संकल्प आणखी मजबूत झाला. पण पुन्हा उठून तुम्ही यावर मात केली.

तुम्हाला खेळण्यासाठी शक्य ते सर्व सहकार्य दिल्याबद्दल मी तुमच्या पालकांचे कौतुक करू इच्छितो. त्यांनी तुम्हाला केवळ एक महान खेळाडू बनण्यासाठीच वाढवले नाही तर तुमच्यामध्ये मजबूत मूल्येही रुजवली आहेत, जे तुमच्या सामन्यानंतरच्या विविध भाषणांमध्ये पाहायला मिळेल. ज्यामध्ये तुम्ही अत्यंत नम्रता दिसलात.

येणारी वर्षे तुमचे इतर छंद जोपासण्यात घालवा. मला खात्री आहे. तुम्ही पुढील खेळाडूंसाठी उत्तम मार्गदर्शक ठराल.
तुम्ही भारतासाठी जे काही केले त्याबद्दल पुन्हा एकदा धन्यवाद आणि तुमच्या भावी आयुष्यासाठी शुभेच्छा.”

एवढा उत्तुंग प्रेम व आशीर्वाद यांच्यासह शुभेच्छा देत पी एम मोदींनी पत्राचा शेवट केला. पंतप्रधान नरेंद्र मोदींनी सानिया मिर्झाला आप्रिसिएट करण्यासाठी लिहिलेले हे पत्र इतर सर्व खेळाडूंसाठी देखील इन्स्पायरिंग व त्यांचा उत्साह वाढवणारा ठरणार आहे.

PM Modi’s letter to Sania Mirza, other athletes got inspiration!

महत्वाच्या बातम्या 

Array

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात