म्यूकरमायकोसिसवरील औषधांसाठी मोदी सरसावले, जगभरातील दूतावासांचे प्रयत्न सुरु


विशेष प्रतिनिधी

नवी दिल्ली : म्यूकरमायकोसिस संसर्गाच्या उपचारांसाठी लागणारी इंजेक्शन, इतर औषधे जगात मिळेल तिथून रातोरात मागवावीत, असा आदेश पंतप्रधान नरेंद्र मोदी दिला आहे. प्रसंगी त्यासाठी आपण स्वतः जागतिक नेत्यांबरोबर बोलू, असे मोदींनी स्पष्ट केले आहे. त्यानंतर जगभरातील भारतीय दूतावासानी यासाठी युद्ध पातळीवर प्रयत्न वेगवान केले आहेत. PM Modi orders for medicines

महाराष्ट्र आणि गुजरातसह देशाच्या अनेक राज्यांत काळ्या बुरशीच्या रोगाने हातपाय पसरले आहेत. याची रुग्णसंख्या ११,७१७ हजारांचा आकडा ओलांडून गेली आहे. कोरोनापाठोपाठ आलेल्या या संसर्गाशी लढण्यासाठी अॅफोटेरेसिरिन बी इंजेक्शनचा व अन्य औषधांचा तुटवडा कोणत्याही स्थितीत जाणवता कामा नये, असे पंतप्रधानांनी बजावले आहे.अमेरिकेच्या गलिएड सायन्सेस कंपनीने अॅम्बिसॉम या इंजेक्शनच्या १ लाख २१००२ लसमात्रा याआधीच पाठवल्या असून आणखी ८५००० देशात येण्याच्या मार्गावर आहेत. या कंपनीकडून पहिल्या टप्प्यात १० लाख इंजेक्शन खरेदी करण्याचे भारत सरकारने ठरवले आहे. कंपनीकडून त्यांचा इंजेक्शनचा सर्व स्टॉक खरेदी करण्याचीही भारताने सज्जता केल्याचे सांगण्यात आले.

PM Modi orders for medicines

महत्त्वाच्या बातम्या

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*    भारतात आता एक देश एक चार्जर जलयुक्त शिवार योजना पुन्हा चालू होणार; शिंदे – फडणवीस सरकारचा महत्त्वाचा निर्णय देशातील सर्वात स्वस्त इलेक्ट्रिक कार झाली लाँच : टाटा टियागो EV अवघ्या 8.49 लाखांपासून; एका चार्जवर 315 किमी